शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

‘त्या’ माजी सैनिकाची हत्याच : दोरीने गळा आवळून संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 20:45 IST

माजी सैनिक भाऊराव गोंडबा मेश्राम यांची दोरीने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी तसा निष्कर्ष व्यक्त केला आहे. मूळचे इंदोरा येथील राहणारे भाऊराव यांचा मृतदेह बुधवारी संशयास्पद स्थितीत घिवारी शिवारातील नाल्यात आढळला होता. त्यावेळी त्यांचा मुलगा राहुल याने वडिलांचा घातपात झाल्याचा आरोप केला होता.

ठळक मुद्देपाच आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (मौदा) : माजी सैनिक भाऊराव गोंडबा मेश्राम यांची दोरीने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी तसा निष्कर्ष व्यक्त केला आहे. मूळचे इंदोरा येथील राहणारे भाऊराव यांचा मृतदेह बुधवारी संशयास्पद स्थितीत घिवारी शिवारातील नाल्यात आढळला होता. त्यावेळी त्यांचा मुलगा राहुल याने वडिलांचा घातपात झाल्याचा आरोप केला होता.याप्रकरणी तपासानंतर अरोली पोलिसांनी पाच आरोपींना शुक्रवारी ताब्यात घेतले. संतोष सेजुसिंग सेंगर (४३), आशिष ऊर्फ सोनू सेजुसिंग सेंगर (३४), रामसिंग ओमकारसिंग गहेरवार (६४), गणेश भाऊराव मरकाम (३२), वासुदेव उरकुडा गजाम (४५) सर्व रा. इंदोरा, अशी आरोपींची नावे आहेत. आरोपीवर खुनाचा तसेच पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळावरून हत्येसाठी वापरण्यात आलेले साहित्यही जप्त करण्यात आले आहे. शनिवारी या पाचही आरोपींना कामठी येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश नेहा पाटील यांच्या न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली.मृत भाऊराव सैन्यात होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांना घिवारी (इंदोरा) येथे शासनाकडून शेतजमीन मिळाली होती. गुरुवारी (दि.९ रोजी) ते नागपूर येथून इंदोरा येथे बहिणीकडे आले होते. १० मे रोजी सकाळी ९ वाजता शेतात गेले होते. शिवारात आरोपी संतोष सेंगर याचे शेत आहे. शेतातच त्याचे घर आहे. आरोपींनी ११ वाजताच्या सुमारास भाऊराव यांना बोलविले होते. नायलॉन दोरीने त्यांचा गळा आवळला. त्यात त्यांचा मृत्यू झाला, नंतर त्यातील काही आरोपी नागपूरला गेले. दोन दिवस मृतदेह घरातच पडून होता. दि.१२ रोजी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पाचही आरोपींनी भाऊरावचा मृतदेह नाल्यात फेकून दिला होता.जेसीबीने खड्डा खोदून मृतदेह गाडणार होतेदोन दिवस मृतदेह घरात ठेवल्यानंतर जेसीबीच्या साह्याने शेतात खड्डा करून तो पुरण्याचा आरोपींचा बेत होता. परंतु जेसीबीचा विश्वसनीय चालक मिळाला नसल्याने त्यांनी बेत बदलला. भाऊराव मेश्राम हे मूळचे इंदोरा येथील रहिवासी होते. सैन्यात दाखल झाल्यानंतर पत्नीच्या प्रकृतीच्या कारणावरुन ते नागपूरला राहण्यासाठी गेले होते. इंदोरा येथे त्यांचा नियमित संपर्क होता.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून