शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा पान टपरीचालकावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 01:17 IST

हॉटेल सेंटर पॉईंटजवळ असलेल्या संतोष नामक पानटपरी चालकावर माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. सोमवारी रात्री १०.२० च्या सुमारास ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्देनागपूरच्या हॉटेल सेंटर पॉईंटजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हॉटेल सेंटर पॉईंटजवळ असलेल्या संतोष नामक पानटपरी चालकावर माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. सोमवारी रात्री १०.२० च्या सुमारास ही थरारक घटना घडली.रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉईंटला लागून संतोषची पानटपरी आहे. दोन आठवड्यापूर्वी तेथे करण राजपूत नामक गुंड त्याच्या साथीदारासह आला होता. त्यावेळी त्यांच्यात पान-सिगारेटच्या बिलावरून वाद झाला आणि दोघांनीही एकमेकांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात संतोषने पोलिसात धावही घेतली. मात्र, त्यावेळी करणचा पिता निवृत्त पोलीस अधिकारी तेथे आला. त्यानेही संतोषविरुद्ध तक्रार देण्याची भूमिका घेतली. पोलिसांनी दोघांच्याही तक्रारी स्वीकारून दोघांवरही गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतल्याने त्यांनी तक्रार देण्यास टाळले. तेव्हापासून करण राजपूत संतोषचा वचपा काढण्याच्या तयारीत होता. नेहमीप्रमाणे आज रात्री संतोष त्याच्या पानटपरीवर असताना अचानक करण राजपूत तेथे आला. तो बाजूच्या दारातून पानटपरीत शिरला आणि त्याने संतोषवर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. जखमी संतोषला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. माहिती कळताच सीताबर्डीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे आपल्या ताफ्यासह तेथे पोहचले. वृत्त लिहिस्तोवर आरोपी पोलिसांना सापडला नव्हता.विशेष म्हणजे, करण राजपूत हा कुख्यात गुंड असून, त्याचे वडील निवृत्त पोलीस निरीक्षक आहे. वडिलांच्या भरवशावर तो गुन्हेगारी करतो. तर, वडीलही त्याच्या गुन्हेगारीला सहकार्य करीत असल्याचे अनेक गुन्ह्यातून स्पष्ट झाले आहे. करणने काही वर्षांपूर्वी शस्त्राच्या धाकावर रिझर्व्ह बँक चौकातील पेट्रोलपंप लुटला होता.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस