शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश नागपुरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 11:51 IST

माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी असलेले चार कलश गुरुवारी सकाळी मुंबईहून विमानाने नागपुरात आणण्यात आले.

ठळक मुद्देविमानतळावर भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी असलेले चार कलश गुरुवारी सकाळी मुंबईहून विमानाने नागपुरात आणण्यात आले. विदर्भात तीन दिवसीय अस्थिकलश यात्रा निघणार असून त्याची सुरुवात नागपुरातून होणार आहे.अस्थिकलशाचे दर्शनासाठी आणि तो स्वीकारण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, शहर भाजपाध्यक्ष सुधाकर कोहळे, महापौर नंदा जिचकार, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर उपस्थित होते.नागरिक व कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी अस्थिकलशाची यात्रा विमानतळाहूनच नागपूर ग्रामीणमध्ये जाणार आहे. निर्धारीत कार्यक्रमानुसार सकाळी १० वाजता बुटीबोरी, दुपारी १२ वाजता हिंगणा, १ वाजता वाडी, २.३० वाजता कोंढाळी, ४ वाजता नरखेड, ५.३० वाजता काटोल व सायंकाळी ७ वाजता कळमेश्वर होत रात्री ८ वाजता सावनेरला पोहचेल.२४ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता सावनेर येथून प्रस्थान केल्यानंतर ११ वाजता खापा, १ वाजता पारशिवनी, २ वाजता रामटेक, ३.३० वाजता मौदा, ५ वाजता कुही, सायंकाळी ६ वाजता उमरेड, ६.१५ वाजता नरसाळा होत नागपूरला पोहचणार आहे. ७.३० वाजता हुडकेश्वर रोड व रात्री ९ वाजता हा कलश मंगलम कार्यालय येथे शहर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या सुपूर्द करण्यात येईल. २५ रोजी अस्थीकलय यात्रा शहरात फिरणार आहे. दुपारी ४ वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे अटलजींना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित राहतील. २६ आॅगस्ट रोजी सकाळी अस्थिकलश यात्रा कामठीकडे जाणार असून येथील महादेव घाटावर सकाळी ९ वाजता या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ. चैनसुख संचेती व प्रदेश महामंत्री रामदास आंबटकर यांनी पत्रपरिषदेत दिली. दुसरा अस्थिकलश २३ ला सकाळी ११ वाजता सेलूवरून निघून विविध भागाची यात्रा करीत २५ रोजी भंडारा येथे विसर्जित करण्यात येईल. तिसरा कलश तिवसा ते मोझरी व चौथा कलश मलकापूर ते खिरोडा अशी यात्रा करून विसर्जित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी