शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात माजी मंत्री रणजित देशमुखांच्या बंगल्यावरील जप्ती टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:15 IST

माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या सावनेर तालुक्यातील हेटी-सुर्ला येथील साखर कारखान्याकडे थकीत असलेली रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्याने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या निर्णयानंतरही रक्कम न मिळाल्याचे शेतकऱ्याने निदर्शनास आणून दिल्यावर सावनेर येथील दिवाणी न्यायालयाने जप्तीचा आदेश काढला.

ठळक मुद्देन्यायालयाच्या आदेशावरून पथक व पोलीस धडकलेएक लाख भरून सामोपचाराने प्रकरण मिटले

आॅनलाईन लोकमतनागपूर : माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या सावनेर तालुक्यातील हेटी-सुर्ला येथील साखर कारखान्याकडे थकीत असलेली रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्याने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या निर्णयानंतरही रक्कम न मिळाल्याचे शेतकऱ्याने निदर्शनास आणून दिल्यावर सावनेर येथील दिवाणी न्यायालयाने जप्तीचा आदेश काढला. या आदेशानुसार गुरुवारी शेतकरी, जप्ती पथक व पोलीस देशमुख यांच्या बंगल्यावर धडकले. मात्र, एक लाख रुपये भरून उर्वरित रक्कम लवकरच देण्याची हमी दिल्यामुळे सोमवारपर्यंत जप्ती टळली.हेटी-सुर्ला येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याचे रणजित देशमुख हे व्यवस्थापकीय संचालक होते. पुसद येथील शेतकरी धनंजय तडकसे यांच्याकडून २००४ मध्ये कारखान्यातील कामगारांसाठी ज्वारी खरेदी करण्यात आली होती. मात्र, पैसे देण्यात आले नाही. तडकसे यांचे कारखान्याकडे ३ लाख ३६ हजार रुपये थकीत होते. त्यांनी वेळोवेळी अर्ज करून, मागणी करूनही रक्कम मिळाली नाही. शेवटी तडकसे यांनी सावनेरच्या दिवाणी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने तडकसे यांना दिलासा देत संबंधित रकम देण्याचे आदेश कारखान्याला दिले. मात्र, त्यानंतरही देशमुख यांनी संबंधित रक्कम परत केली नाही. शेतकºयाने ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत संबंधित रक्कम वसूल करण्यासाठी देशमुख यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. यानुसार शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास जप्ती पथक देशमुख यांच्या जीपीओ चौकातील बंगल्यावर धडकले. सीताबर्डी पोलिसांचे पथकही सोबत होते. मात्र, कारवाईपूर्वीच देशमुख यांचे पुत्र डॉ. अमोल देशमुख तेथे पोहचले. रणजित देशमुख हे अंदमानला गेले असल्याचे सांगत, त्यांनी एक लाख रुपये जमा केले तसेच उर्वरित रक्कम रणजितबाबु परतल्यावर जमा करण्याची हमी दिली. या वेळी झालेल्या तडजोडीनंतर जप्तीची कारवाई सोमवारपर्यंत टाळण्यात आली.

 

टॅग्स :nagpurनागपूरCourtन्यायालय