शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

माजी महापौर हिवरकरच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:47 IST

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनोरंजन केंद्राच्या आड चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारून या अड्ड्याचा संचालक माजी महापौर पांडुरंग हिवरकर याच्यासह २६ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केली. यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली होती.

ठळक मुद्देक्रीडा आणि मनोरंजन केंद्र बनले अड्डा : लाखोंची हार-जित : २६ जुगारी पकडले :

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनोरंजन केंद्राच्या आड चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारून या अड्ड्याचा संचालक माजी महापौर पांडुरंग हिवरकर याच्यासह २६ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केली. यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली होती.रामेश्वरी चौकाजवळ हिवरकर आॅरेंजसिटी क्रीडा आणि मनोरंजन केंद्र सुरू केले होेते. या केंद्राआड जुगार अड्डा चालविला जातो, अशी माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने सोमवारी मध्यरात्री येथे छापा घातला. यावेळी तेथे मोठ्या संख्येत जुगारी ताशपत्त्याचा जुगार खेळत असल्याचे आढळले. पोलिसांनी तेथून हिवरकरसह किसन वसंतराव प्रधान (वय २४, रा. कौशल्यानगर), अनिल अशोक काशी (वय ४५, रा. रेल्वे पोलीस मुख्यालयाजवळ), सचिन रामदास नगराळे (वय ३३, रा. कुकडे लेआऊट), विजय सोमाजी वलके (वय ४२, रा. न्यू कैलासनगर), मनोहर हरिश्चंद्र नागदेवे (वय ५९, रा. जयभीमनगर), भीमराव घनश्याम कैथवास (वय ४८, रा. शताब्दी चौकाजवळ, अजनी), विनोद मारोतराव चहांदे (वय ५६, रा. धाडीवाल लेआऊट), किशोर शंकरराव साठवणे (वय ३९, रा. विश्वकर्मानगर), मनोज राजेंद्र गुप्ता (वय ३३, रा. स्वागतनगर), शेखर बापुराव चिमूरकर (वय ४५, रा. श्रीरामनगर), आशिष सुरेश राऊत (वय २८, रा. जयभीमनगर), अमर ताराचंद नंदागवळी, पारस आत्माराम कोलते (वय ४२, रा. जयभीमनगर), अतुल संतोष पेंटा (वय ४८, रा. आदिवासी कॉलनी), राजू देवचंद श्रीवास (वय ५५, रा. बडकस चौक), राजेश ज्ञानेश्वर दांडेकर (वय ४८), नितीन राजू रंगारी (वय २९), सुधीर दशरथ मेंढे (वय ४५), दिनेश रामदास तोतडे (वय ४०, रा. रघुजीनगर), सुरेश राजवंशी चव्हाण (वय ५१, रा. बेलतरोडी), राजेश विजेंद्र पालेवार (वय २८, रा. न्यू बाबुळखेडा), विजय शालिकराम राठी (वय ६१, रा. रामदासपेठ) आणि उमेश कैलास सातकर (वय ४२, रा. त्रिशरण चौक) यांना जुगार खेळताना पकडले.व्यवस्थापक, मदतनीसही गजाआडएक जुगारी पळालाक्लबचा व्यवस्थापक सुरेश श्रावण पारशिवनीकर (वय ५२) आणि जुगाºयांना प्लास्टिकचे कॉईन उपलब्ध करून देणारा विजय भीमराव वाघमारे (वय ५२, रा. काशीनगर) यांना अटक करण्यात आली. कारवाईदरम्यान संधी मिळताच एक जुगारी पळून जाण्यात यशस्वी ठरला. जुगाऱ्यांकडून रोख, कॉईन, ताशपत्ते आदीसह एकूण १ लाख ७ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारत क्षीरसागर, सहायक निरीक्षक किरण चौगुले, हवालदार राजू डांगे, सतीश मेश्राम, सुखदेव मडावी, नृसिंह दमाहे, संजय देवकर, सतीश निमजे, रामकैलास यादव, प्रशांत कोडापे, अविनाश ठाकूर, ज्ञानेश्वर तांदूळकर, गोविंद देशमुख यांनी ही कामगिरी बजावली.पोलिसांचे पितळ उघडेपांडूरंग हिवरकर हे माजी महापौर आहेत. यापूर्वी एक असाच बहुचर्चित जुगार अड्डा अजनी-सक्करदऱ्यात आलटूनपालटून चालायचा. या अड्ड्यावरदेखील यापूर्वी पोलिसांनी छापा मारून हिवरकर यांना अटक केली होती. आॅरेंजसिटी क्रीडा आणि मनोरंजन केंद्राचा परवाना घेताना हिवरकरने धर्मादाय आयुक्तांकडे त्याची रीतसर नोंदणी केली. मात्र, परवानगी मिळवताना घालून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन न करता येथे चक्क जुगार अड्डा चालविला जात होता. अजनी पोलीस ठाण्यात काही जणांना या जुगार अड्ड्याची माहिती होती. मात्र, मोठी देण मिळत असल्याने अजनीतील मंडळी त्याकडे दुर्लक्ष करीत होती, असे समजते. गुन्हे शाखेकडून कारवाई झाल्यामुळे या जुगार अड्ड्याशी संलग्न असलेल्या पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा