शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माजी महापौर अटलबहादूर सिंग यांचे निधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 17:06 IST

माजी अटलबहादूर सिंग यांचे आज आजाराने निधन झाले. ते १९७७ व १९९४ असे दोन वेळा नागपूरचे महापौर होते. ते किंगमेकर म्हणून ओळखले जात होते.

नागपूर : माजी महापौर अटलबहादूर सिंग यांचे शुक्रवारी निधन झाले. मागील काही दिवसापासून त्यांच्यावर जैन रुग्णालयात उपचार सुरू होते. ते १९७७ व १९९४ असे दोन वेळा नागपूरचे महापौर होते. गत काळात नागपूर शहराचे राजकारण त्यांच्या आजूबाजूलाच फिरत होते. 

एकेकाळी महापालिकेत ‘किंग मेकर’ची भूमिका बजावणारे अटलबहादूर सिंग यांची, दिलेला शब्द पाळणारा आणि जात-धर्माच्या पलीकडचा दिलदार माणूस अशी ओळख होती.  ते १९७४ -७५ मध्ये उपमहापौर होते. व त्यानंतर १९७७-७८ व १९९४-९५  असे दोन वेळा नागपूरचे महापौर होते. 

त्यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळात मनपातर्फे राष्ट्रपतींचा नागरी सत्कार, तसेच व्हीसीए मैदानावर लता मंगेशकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता. त्यांनी नागरी सत्काराची परंपरा सुरू केली. तसेच समुहगाण स्पर्धेला सुरुवात केली. त्यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक वर्तूळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिलदार मित्र गमावला - नितीन गडकरी 

नागपूर शहराचे माजी महापौर सरदार अटलबहादूर सिंग यांच्या निधनामुळे एक जिवश्च-कंठश्च आणि दिलदार मित्र आपण गमावला असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शोक संदेशात व्यक्त केली आहे. कधीही जात-धर्म-पंथ या भेदांत न अडकलेले अटलबहादूर हे माझ्यासाठी मित्र आणि सुहृद होते. त्यांचा-माझा संबंध दीर्घकाळापासूनचा होता. आमची मैत्री पक्षातीत होती व शेवटपर्यंत टिकली. एक अनमोल मित्र गमावल्याचे अपार दुःख मला झाले आहे, असेही गडकरी म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना

नागपूरचे माजी महापौर सरदार अटलबहादूर सिंग यांच्या निधनाने नागपूरचे कला-सांस्कृतिक विश्व समृद्ध करणारा, शहराच्या विकासासाठी नितांत कळकळ असलेला आणि प्रखर राष्ट्रवादी नेता हरपला आहे, अशी शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूSocialसामाजिक