जैन तत्त्वज्ञानातील क्षमा ही जगताला सर्वोत्तम देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 09:38 PM2021-10-12T21:38:12+5:302021-10-12T21:39:02+5:30

Nagpur News जैन तत्त्वज्ञानातील क्षमा, अपरिग्रह ही जगताला मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे. या तत्त्वातच अहिंसेचे मूल्य आहे. या तत्त्वाचा प्रसार सर्वत्र व्हावा, असे आवाहन लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.

Forgiveness in Jain philosophy is the best gift to the world | जैन तत्त्वज्ञानातील क्षमा ही जगताला सर्वोत्तम देणगी

जैन तत्त्वज्ञानातील क्षमा ही जगताला सर्वोत्तम देणगी

Next
ठळक मुद्देदर्शन दुगडने घेतले आशीर्वाद

नागपूर : जैन तत्त्वज्ञानातील क्षमा, अपरिग्रह ही जगताला मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे. या तत्त्वातच अहिंसेचे मूल्य आहे. या तत्त्वाचा प्रसार सर्वत्र व्हावा, असे आवाहन लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. (Forgiveness in Jain philosophy is the best gift to the world, Vijay Darda)

यूपीएससी परीक्षेत देशात १३८ वा तर विदर्भात दुसरा आलेल्या यवतमाळ, आर्णी येथील दर्शन दुगड याचा लोकमत भवन येथे मंगळवारी विजय दर्डा यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी दर्शनला स्वलिखित ‘स्ट्रेट थॉट’, ‘पब्लिक इशू बिफोर पार्लमेंट’ व लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांचे आत्मचरित्र ‘माझी भिंत’ हे पुस्तक भेट दिले.

संस्कार हे आपल्या भारतीय संस्कृतीचे सर्वोत्तम वैशिष्ट्य आहे. आपल्या ऋषीमुनींनी जगताला जीवन जगण्याचे विज्ञान दिले आहे. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम व जैन आचार्य महाप्रज्ञा यांनी ते तत्त्व सर्वत्र प्रसारित केले. संस्काराचा हा वारसा असाच पुढे जायला हवा. आपण जे आहोत ते आपल्या आई-वडिलांमुळे. तेच ईश्वर आहेत. त्यांच्या पुढे काहीच नाही. आईने दिलेले संस्कार आणि वडिलांनी दाखवलेली दिशा, हे सर्वोत्तम तत्त्व आहेत. त्यांना कधीच विसरू नका आणि यशाचे शिखर गाठा, असा शुभाशीर्वाद विजय दर्डा यांनी दर्शनला दिला. दर्शन दुगड यानेही यावेळी आभार व्यक्त करत आपल्या मूल्यवान मार्गदर्शनाचे कायम स्मरण करत राहीन, अशी भावना व्यक्त केली. याप्रसंगी दर्शनचे वडील प्रकाशचंद फुलचंदजी दुगड, मोठे वडील उत्तमचंद दुगड, काका मदन दुगड, डॉ. शुभम दुगड, डॉ. अभिलाषा दुगड, योगेश गोलछा, योगिता गोलछा व अतुल कोटेचा उपस्थित होते.

............

Web Title: Forgiveness in Jain philosophy is the best gift to the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.