शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

उमरेड-कऱ्हांडला वनपर्यटनाला परवानगी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 21:21 IST

राज्य शासनातर्फे अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून केंद्राच्या मार्गदर्शनानुसार राज्यात वनपर्यटन सुरू करण्यात येत आहे. मात्र उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील पर्यटन करण्यासाठी पर्यटकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. वन विभागाने येथील पर्यटन सुरू करण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्य शासनातर्फे अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून केंद्राच्या मार्गदर्शनानुसार राज्यात वनपर्यटन सुरू करण्यात येत आहे. मात्र उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील पर्यटन करण्यासाठी पर्यटकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. वन विभागाने येथील पर्यटन सुरू करण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे.कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २३ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यानुसार उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील पर्यटनावरही बंदी आली होती. सध्या अनलॉक-२ सुरू झाले आहे. त्यामुळे निसर्ग पर्यटनाशी निगडित स्थानिक लोकांचा रोजगार पूर्ववत करण्याच्या हेतूने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रधान वन संरक्षक, नागपूर आणि जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने ४ जुलैपासून उमरेड-कऱ्हांडला पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अभयारण्य गेटच्या क्षेत्राजवळ असलेल्या नवेगाव (साधू) ग्रामपंचायत तसेच महाराष्ट्र राज्य अभयारण्य गाईड्स युनियन यांनी पर्यटन सुरू केल्यास बाहेरून होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची भीती व्यक्त करीत पर्यटन सुरू करण्याचे निवेदन केले. स्थानिकांचा विरोध पाहता येथील पर्यटन सुरू करण्यास पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी सांगितले.

टॅग्स :forestजंगलtourismपर्यटन