शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात वन अधिकारी लाच घेताना अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 11:22 IST

शेताला तारांचे कुंपण घालण्याची परवानगी देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात अटक केली.

ठळक मुद्दे३० हजार रुपयांची मागणी केली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेताला तारांचे कुंपण घालण्याची परवानगी देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवनी येथे मंगळवारी सायंकाळी करण्यात आली.किशोर मारोतराव कैलुके, असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर वन परिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारकर्ता श्ोतकरी हा हिवराबाजार (ता. रामटेक) येथील असून, त्याची हिवराबाजार शिवारात ३.१४ हेक्टर शेती आहे.सदर शेती विकत घेतल्याने त्याने शेतीची भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून मोजणी केली आणि त्याची क प्रतही मिळविली. या शेताला तारांचे कुंपण करावयाचे असल्याने त्याला वन विभागाची परवानगी हवी होती. त्यामुळे त्याने वन परिक्षेत्र अधिकारी किशोर कैलुके यांची भेट घेतली आणि परवानगी मागितली.सदर कामासाठी कैलुके यांनी त्या शेतकऱ्याला ३० हजार रुपयांची मागणी केली. परंतु, ही रक्कम देण्याची शेतकऱ्याची इच्छा नसल्याने त्याने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयात तक्रार नोंदविली होती. ठरल्याप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सापळा रचला. कैलुके यांनी पहिल्या हप्त्यातील १० हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडून अटक केली. हल्ली रामटेक तालुक्यातील देवलापार पिरसरातील बहुतांश शेतकरी वन अधिकाऱ्यांच्या असल्या कारभाराला व त्रासाला वैतागले आहेत. त्यातच ही कारवाई झाल्याने वन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर काहीसा वचक निर्माण झाला आहे.याप्रकरणी त्यांच्याविरोधात देवलापार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुदलवार यांच्या मार्गदर्शनात एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल गीते, हवालदार अशोक बैस, शिपाई रविकांत डहाट, मंगेश कळंबे, वकील शेख यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी