शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

वन विभागाचे आरोपींना अभय

By admin | Updated: November 15, 2015 02:13 IST

रामटेक तालुक्यातील पवनी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सवंदनी शिवारात सागवानाची ५८ झाडे अवैधरीत्या तोडण्यात आली.

अवैध वृक्षतोड प्रकरण : चौकशी थंडबस्त्यात, बुंध्यांवर बोगस हॅमरचे निशाणकैलास निघोट देवलापार रामटेक तालुक्यातील पवनी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सवंदनी शिवारात सागवानाची ५८ झाडे अवैधरीत्या तोडण्यात आली. या झाडांच्या बुंंध्यांवर मारण्यात आलेले हॅमर हे बोगस असल्याचा आरोप जाणकारांनी केला आहे. यात सहायक वन संरक्षक वीरेसन यांच्यासह अन्य काही अधिकारी व कर्मचारी समाविष्ट असल्याने सदर प्रकरणाची चौकशी ही थंडबस्त्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रामटेक तालुक्यातील सवंदनी शिवारातील वरघाट नाल्याच्या काठावरील सागवानाची ५८ झाडे तोडण्यात आली. ही सर्व झाडे झनक सोनवणे यांच्या शेतालगत असल्याने ती सोनवणे यांनी विकली होती. विक्रीचा व्यवहार पूर्ण होताच ही झाडे लगेच तोडून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. विशेष म्हणजे, ही झाडे तोडण्यासाठी महसूल अथवा वन विभागाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. ही सर्व झाडे तीन दिवसांत तोडण्यात आली असून, त्यासाठी इलेक्ट्रिॉनिक मशीनचा वापर करण्यात आल्याचे जाणकारांनी सांगितले. तोडण्यात आलेली झाडे वन विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत असून, ती तोडण्याचा कुणालाही अधिकार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. तरीही ही झाडे विकण्यात व तोडण्यात आली. सोनवणे यांनी ही झाडे कुणाला विकली, ती कुणी कापली, याबाबत वन विभागाकडे माहिती उपलब्ध नाही. या झाडांचा सौदा करतेवेळी बोगस वन कर्मचारी सोनवणे यांच्याकडे गेले होते. या कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराशी हा सौदा करून दिला. त्यावेळी झाडे तोडण्याच्या परवानगीची हमी घेण्यात आली होती. सदर प्रकरण चव्हाट्यावर येताच वन विभागाने कारवाई करायला सुरुवात केली. यातील काही झाडांच्या बुंध्यावर हॅमरने मारण्यात आले. या हॅमरच्या निशाणाकडे बारकाईने बघितले असता, ते बोगस असल्याचा आरोप काही जाणकारांनी केला आहे. या झाडांच्या लाकडांची टीपी (ट्रॉन्सपोर्ट परमिट) वन विभागाच्या देवलापार कार्यालयातून देण्यात आले. या टीपीच्या आधारे ही लाकडं नागपूरकडे नेण्यात आली.सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहायक वनसंरक्षक वीरसेन यांची नियुक्ती करण्यात आली. वास्तवात वीरसेन यांची कार्यप्रणाली व वागणूक वादग्रस्त राहिली आहे. ते या प्रकरणाची चौकशी करण्यास मुद्दाम दिरंगाई करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आ. डी. एम. रेड्डी व भाजयुमोचे सचिव मूलचंद यादव यांनी मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे केली आहे. वृक्षतोडीची परवानगी नाकारली होतीसागवान झाडे तोडण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी झाडे कापण्यासाठी वन विभागाकडे रीतसर परवानगी मागण्यात आली होती. यासाठी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यामार्फत प्रस्ताव पाठवावा लागतो. या नाल्याकाठी असलेली झाडे कुणाच्या खासगी मालकीची नसून ती वनविभागाची असल्याचे सांगून वन विभागाने ती झाडे तोडण्याची परवानगी त्यावेळी नाकारली होती. सध्या याच झाडांचा सौदा घाईघाईत करण्यात आला आणि या झाडांची क्षणाचाही विलंब न करता विल्हेवाट लावण्यात आली. या बाबीकडे वन अधिकाऱ्यांनी यावेळी दुर्लक्ष केले आहे. ती झाडे वन विभागाचीतोडण्यात आलेली नाल्याकाठची झाडे ही वन विभागाच्या मालकीची असून, ती संरक्षित वन क्षेत्रातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु, या झाडांच्या कटाईकडे वन अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. ही झाडे तीन दिवस तोडण्यात आली. त्याच्या बुंध्यांवर रोज हॅमर मारण्यात आले. काही वन कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या बचावासाठी त्यांना हवे तसे पंचनामे तयार करवून घेतले. विशेष म्हणजे, संपूर्ण लाकडांची योग्य विल्हेवाट लावण्यात आल्यानंतर पंचनामे करण्यात आले. या संदर्भात नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे.