शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आता नागपूर विद्यापीठात येणार नाहीत विदेशी विद्यार्थी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 23:19 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यापुढे एकही विदेशी विद्यार्थी अध्ययनासाठी येणार नाही असे स्वप्नच जणू प्रशासनाला पडले आहे. म्हणूनच की काय विदेशी विद्यार्थ्यांसाठी बनविण्यात आलेल्या ‘नेल्सन मंडेला’ विदेशी विद्यार्थी वसतिगृहाचे नावच बदलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच या वसतिगृहात आता ‘पीएचडी’ संशोधकांनादेखील प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी यासंदर्भात विधिसभेच्या बैठकीत बुधवारी घोषणा केली.

ठळक मुद्देविदेशी विद्यार्थ्यांचे वसतिगृह ‘पीएचडी’ संशोधकांना : विधिसभेत कुलगुरूंची घोषणा

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यापुढे एकही विदेशी विद्यार्थी अध्ययनासाठी येणार नाही असे स्वप्नच जणू प्रशासनाला पडले आहे. म्हणूनच की काय विदेशी विद्यार्थ्यांसाठी बनविण्यात आलेल्या ‘नेल्सन मंडेला’ विदेशी विद्यार्थी वसतिगृहाचे नावच बदलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच या वसतिगृहात आता ‘पीएचडी’ संशोधकांनादेखील प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी यासंदर्भात विधिसभेच्या बैठकीत बुधवारी घोषणा केली. यापुढे वसतिगृहाचे नाव नेल्सन मंडेला संशोधक भवन असे राहणार आहे.विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांत प्रवेश घेणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांसाठी १९९७ साली नेल्सन मंडेला विदेशी विद्यार्थी वसतिगृहाचे निर्माण केले होते. त्यावेळी विद्यापीठात शेकडो विदेशी विद्यार्थी अभ्यासासाठी यायचे. मात्र विद्यापीठाच्या धोरणांमुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी होत गेली. ही स्थिती सुधारण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून कुठलीही पावले उचलण्यात आली नाही. वसतिगृहाची अवस्थादेखील अतिशय दयनीय झाली होती.अखेर काही काळापूर्वी या वसतिगृहाचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र विदेशी विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने चालू शैक्षणिक वर्षात येथे ‘पीएचडी’ संशोधकांना राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या इतर वसतिगृहांच्या तुलनेत येथे जास्त शुल्क ठेवण्यात आले आहे. संशोधकांना येथे राहण्यासाठी १२ हजार रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. बुधवारी विधिसभेच्या बैठकीत सदस्यांनी हे शुल्क कमी करण्याची मागणी लावून धरली. मात्र खर्चाचा हवाला देत ही मागणी मान्य करण्यास प्रशासनाने नकार दिला.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थी