शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पासपोर्ट देणाऱ्या बोगस वेबसाईटवर विदेश मंत्रालयाचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:13 IST

पासपोर्ट तयार करण्याच्या नावाखाली बोगस वेबसाईट तयार करून अर्जदारांकडून मनमानीपणे वसुली करणाऱ्यांबाबत विदेश मंत्रालयाने कडक धोरण अवलंबले आहे. यासंदर्भात मंत्रालयाने गुगलला पत्र लिहिले आहे. पासपोर्ट इंडियाच्या वेबसाईटसारखीच हुबेहुब बोगस वेबसाईट तयार करून तिपटीने रक्कम उकळण्याचे प्रकार घडले आहेत.

ठळक मुद्देगुगलला पत्र : दलालांकडून चौपटीने वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पासपोर्ट तयार करण्याच्या नावाखाली बोगस वेबसाईट तयार करून अर्जदारांकडून मनमानीपणे वसुली करणाऱ्यांबाबत विदेश मंत्रालयाने कडक धोरण अवलंबले आहे. यासंदर्भात मंत्रालयाने गुगलला पत्र लिहिले आहे. पासपोर्ट इंडियाच्या वेबसाईटसारखीच हुबेहुब बोगस वेबसाईट तयार करून तिपटीने रक्कम उकळण्याचे प्रकार घडले आहेत.सूत्रांंनी दिलेल्या माहितीनुसार, विदेश मंत्रालयाने यासंदर्भात आयटी विभागालाही पत्र लिहिले आहे. अधिकृत वेबसाईटसारखीच वाक्ये, लोगो, डिझाईन वापरणाऱ्या बनावट वेबसाईटवर याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. पासपोर्टसाठी विदेश मंत्रालयाची ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट पासपोर्टइंडिया डॉट जीओव्ही डॉट इन’ ही एकमेव वेबसाईट आहे. याशिवाय ‘एमपासपोर्ट सेवा’ नावाने एक मोबाईल अ‍ॅपही सेवेत आहे. हे अ‍ॅप मोबाईलवर डाऊनलोड करताच संबंधित सेवा नागरिकांना सहजपणे मिळू शकतात. पासपोर्ट तयार करण्यासाठी अधिकृतपणे दीड हजार रुपयांचा खर्च येतो, तर तात्काळ पासपोर्टसाठी फक्त ३,५०० रुपयांचा खर्च येतो. मात्र याच कामासाठी बनावट वेबसाईटकडून पाच ते आठ हजार रुपये ग्राहकांकडून उकळले जातात.सायबर क्राईम... तरीही बचावपासपोर्टच्या अर्जासाठी बनावट वेबसाईट चालविणाऱ्या मंडळींनी सायबर क्राईमच्या कारवाईतून पळवाट काढण्याची शक्कलही लढविली आहे. ही मंडळी आपल्या वेबसाईटवर डिस्क्लेमर(अस्वीकरण)मध्ये कन्सल्टन्सी (सल्लामसलत) असे लिहितात. आपल्या पोर्टलमध्ये मात्र अर्जदारांकडून जी माहिती मागविली जाते ती पासपोर्ट इंडियाच्या वेबसाईटवरून मागविल्या जाणाऱ्या माहितीसारखीच आणि अगदी तशाच क्रमात मागविली जाते. डिस्क्लेमरमध्ये कन्सल्टन्सी असा उल्लेख केल्यामुळे हा प्रकार सायबर क्राईमच्या कार्यकक्षेतून निसटतो. असे असले तरी अन्य पुराव्यांचा आधार घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई मात्र करता येते.पासपोर्टसाठी सरकारची अधिकृत वेबसाईट असताना अशा बोगस वेबसाईटवरून अर्ज मागविणे धोकादायक ठरू शकते. ग्राहकांकडून भरल्या जाणाऱ्या माहितीचा दुरुपयोग होण्याची शक्यता यात अधिक आहे. अर्जदारांकडून मनमानीपणे शुल्कही वसूल केले जाते. हे टाळण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटचा वापर करा आणि धोका होण्यापासून स्वत:ला वाचवा.- सी. एल. गौतम, विभागीय पासपोर्ट अधिकारी, नागपूर

टॅग्स :passportपासपोर्टgoogleगुगल