शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

जबरानजोतधारकांच्या अडचणी वाढल्या

By admin | Updated: June 16, 2014 01:01 IST

गडचिरोली जिल्ह्यात वैयक्तिक स्वरूपाचे वनपट्टे वाटपाचे काम देशात प्रथम क्रमांकाचे झाले आहे. जिल्ह्यात ३० हजार १६७ जबरानजोतधारकांना पट्टे वितरित करण्यात आले. मात्र त्यापैकी २ हजार ५४८ शेतकऱ्यांना

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात वैयक्तिक स्वरूपाचे वनपट्टे वाटपाचे काम देशात प्रथम क्रमांकाचे झाले आहे. जिल्ह्यात ३० हजार १६७ जबरानजोतधारकांना पट्टे वितरित करण्यात आले. मात्र त्यापैकी २ हजार ५४८ शेतकऱ्यांना पट्ट्याच्या शेतीचा सातबारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या कुठल्याही शेती योजनेचा लाभच मिळत नाही. त्यामुळे हे शेतकरी अडचणीत आले आहे. केंद्र सरकारने २००८ मध्ये वन कायदा शिथिल केल्यानंतर अनेक वर्षापासून जमीन कसणारे भूमिस्वामी झाले. २०१३ पर्यंत ३० हजार १६७ जबरानजोतधारकांना वन जमिनीच्या पट्ट्याचे वाटप करण्यात आले. परंतु त्यातील २ हजार ५४८ पट्टेधारकांना अद्यापही महसूल विभागाकडून सातबारा देण्यात आलेला नाही. गडचिरोली तालुक्यात १९, धानोरा ४२४, चामोर्शी ६३६, मुलचेरा ३७०, देसाईगंज १४४, आरमोरी १४४, कुरखेडा १३१, कोरची २९, अहेरी १४६, सिरोंचा १८०, एटापल्ली २४५, भामरागड तालुक्यातील ८० जबरानजोतधारकांना सातबारा मिळालेला नाही. जिल्ह्यात ३० हजार १६७ पैकी २६ हजार ७७६ पट्टेधारकांना सातबारा देण्यात आला. मात्र २ हजार ५४८ पट्टेधारकांना अद्याप सातबारा मिळालेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पीक कर्ज आदी मिळण्यात अडचणी येत आहे. (शहर प्रतिनिधी)