शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची फूलप्रूफ प्लॅनिंग : अपघात आणि गुन्हे मुक्त राहिले नागपूर शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 21:07 IST

होळीच्या दिवसात अपघात अन् गुन्हे हमखास घडत असतात. परंतु ही होळी यादृष्टीने चांगली गेली. पोलिसांच्या ‘फुलप्रूफ’ बंदोबस्त व नियोजनामुळे गुन्हेगार व असामाजिक तत्त्वांना सक्रिय होण्याची संधीच मिळाली नाही.

ठळक मुद्देहोळीनिमित्त विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : होळीच्या दिवसात अपघात अन् गुन्हे हमखास घडत असतात. परंतु ही होळी यादृष्टीने चांगली गेली. पोलिसांच्या ‘फुलप्रूफ’ बंदोबस्त व नियोजनामुळे गुन्हेगार व असामाजिक तत्त्वांना सक्रिय होण्याची संधीच मिळाली नाही. तसेच वाहतुक पोलिसांनी राज्यात सर्वात मोठी मोहीम राबवित दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांसह हैदोस घालणाऱ्यांना थंड केले. त्यामुळे या होळीमुळे अपघात आणि गुन्हे घडले नाही, हे विशेष!होळीच्या दिवशी नेहमीच गुन्हेगार आपले जुने वाद उकरून काढतात. त्यामुळे खून, मारहाणीच्या घटना घडत असतात. यासाठी पोलिसांनी यंदा विशेष उपाययोजना केल्या होत्या. पोलिसांनी काही गुन्हेगार आणि उपद्रव करणाऱ्यांना अगोदरच तुरुंगात पाठवले होेते. जे यातून वाचले त्यांना शहराबाहेर पाठवण्यात आले. होळीत दुसरी सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे अपघात होय. याचे मुख्य कारण दारू पिऊन वाहन चालवणे आणि वाहन चालवताना गोंधळ घालणे होय. यासाठी वाहतूक विभागाचे डीसीपी विक्रम साळी यांनी व्यापक बंदोबस्त केला होता. जागोजागी बॅरिकेट्स लावून वाहन चालकांना रोखले जात होते. ब्रीथ अ‍ॅनलायजरने त्यांची तपासणी केली जात होती. अपघात मुक्त शहर ठेवण्याची मुख्य संकल्पना पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची होती. ती काटोकोरपणे राबवण्यात आली. स्वत: पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय हे देखरेख करीत होते. या फुलप्रूफ बंदोबस्तामुळे शहरात अपघात व गुन्हेगारीच्या घटनांवर पूर्ण नियंत्रण ठेवता आले. याचे चांगले परिणाम दिसून आले.नागरिकांच्या मदतीमुळेच शक्यसराईत गुन्हेगार आणि होळीत गडबड करू शकतील, अशा गुन्हेगारांविरुद्ध अगोदरच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. संवेदनशील पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे उपद्रवी लोकांना सक्रिय होण्याची संधीच मिळाली नाही. हे सर्व नागरिकांमुळेच शक्य झाले. नागरिकांच्या मदतीमुळेच नागपूर पोलीस प्रत्येक मोर्चावर यशस्वी ठरले. नागपूरकर विपरीत परिस्थितीतही संयम आणि शांतीने राहतात. नागपूर पोलिसांसाठीसुद्धा ही अभिमानाची बाब आहे. डॉ. भूषणकुमार उपाध्याय,पोलीस आयुक्त, नागपूर शहर

टॅग्स :HoliहोळीNagpur Policeनागपूर पोलीस