कामठी : ग्रामीण भागातील तरुणांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगत सेवा कार्य करावे. सक्षम समाजनिर्मिती करावी असे आवाहन राजे मुधोजी भोसले यांनी केले. कामठी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठानच्या वतीने निंबाजी आखाडा सभागृहात आयोजित मानचिन्ह लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे महासचिव डॉ. राकेश तिवारी, जुनी कामठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय मालचे, गणेश सायरे, येरखेडा जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य मोहन माकडे, सरपंच मंगला कारेमोरे, नागपूर जिल्हा शिवसेनेचे उपप्रमुख राधेशाम हटवार, माजी नगराध्यक्ष अंकुश बावनकुळे, देवराव तुपट उपस्थित होते. याप्रसंगी शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींचा प्रतिष्ठानाचे मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक नंदिनी चौधरी यांनी केले. संचालन हितेश बावनकुळे, किर्ती मुरमारे यांनी तर आभार प्रदर्शन चंद्रशेखर तुप्पट यांनी मानले.
छत्रपतींच्या सेवाकार्याचा आदर्श बाळगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:42 IST