शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

लोककलावंतांचा मानच, ‘धन’ नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 10:22 IST

वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन व प्रबोधन करणाऱ्या लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी शासनातर्फे मानधन योजना राबविली जाते. मात्र सरकारने पैसा नसल्याचे कारण देत हात वर केल्याने या योजनेला खीळ बसल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देतीन वर्षापासून मानधन थकलेसरकारने केले हात वर वृद्धापकाळातील आधाराला खीळ

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन व प्रबोधन करणाऱ्या लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी शासनातर्फे मानधन योजना राबविली जाते. मात्र सरकारने पैसा नसल्याचे कारण देत हात वर केल्याने या योजनेला खीळ बसल्याचे दिसत आहे. २०१७-१८ मध्ये नव्याने मंजूर झालेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांसह आधीच्या कलावंतांनाही गेल्या तीन वर्षापासून वृद्धापकाळ मानधन मिळाले नसल्याने अभावग्रस्त वृद्ध कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.महाराष्ट्राची संस्कृती समृद्ध करण्यात आणि जतन करून ठेवण्यात खºया अर्थाने या राज्यातील लोककलावंतांचा सिंहाचा वाटा आहे. या कलावंतांनी आपले सबंध आयुष्य लोककलांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्यात घालविले. संगीत तमाशा, शाहिरी पोवाडे, लावण्या, प्रबोधनकार, देवीचा जागर, गोंधळ, डायका, भारुड, नकलाकार, भजन मंडळ, कीर्तनकार, गीत गायक, नृत्य करणारे व विविध वाद्य वाजविण्यात निपुण कलावंत व साहित्यिकांनी या कलांना वाढविले आणि पुरोगामी चळवळीला जिवंत ठेवले. उमेदीचा काळ त्यांनी या सेवेत वाहिला. त्यांच्या उदरभरणाचे साधनही हेच होते. बहुतेक कलावंत शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले असल्याने रोजमजुरी व कामधंदा मिळणे कठीण असते. अशात समाज व कुटुंबाकडून होणारी उपेक्षा व शासनाकडून होणाºया दुर्लक्षामुळे वृद्धावस्थेत त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागते.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने नियमानुसार २०१७-१८ साली ६० कलावंतांची यादी राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाला पाठविली व ती मंजूरही करण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत या निवड झालेल्या कलावंतांचे मानधन जमा झाले नाही. एवढेच नाही तर २०१५-१६ पासूनच कलावंतांच्या खात्यात मानधन जमा झाले नसल्याची माहिती निवड झालेल्या कलावंतांनी लोकमतला दिली आहे. यानुसार गेल्या तीन वर्षापासून हे सर्व लोककलावंत मानधनापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे २०१८-१९ या वर्षाला मानधनासाठी आलेले लोककलावंतांचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. निवड समितीचे सदस्य दयाल कांबळे यांनी सांगितले, थकीत मानधनासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला वारंवार विचारणा केली आहे. मात्र शासनाकडून पैसा न आल्याची सबब त्यांच्याकडून दिली जाते. दुसरीकडे सांस्कृतिक संचालनालयालाही याबाबत निवेदन सादर केले असता त्यांच्याद्वारे पैसा नसल्याचे कारण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. योजनेंतर्गत कलावंतांना दर्जानुसार मानधन दिले जाते. यामध्ये राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या कलावंताला ‘अ’ दर्जा देऊन २१०० रुपये मानधन आहे.राज्य व जिल्हा पातळीवरील ब व क विभागाच्या कलावंतांना अनुक्रमे १८०० व १५०० रुपये दरमाह मानधन देण्याची योजना आहे. नागपूर जिल्हापरिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी ४०० ते ५०० कलावंत या योजनेच्या लाभासाठी अर्ज करतात. मात्र शासन निर्णयानुसार त्यातील केवळ ६० कलावंतांची निवड केली जाते. ते तुटपुंजे असले तरी औषधपाणी व इतर खर्च निघून जातो. मात्र हेच मानधन थकीत झाल्याने या वृद्ध कलावंतांना अगतिकता सहन करावी लागत असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

समिती सदस्यांचा बैठक भत्ताही थकला२०१५-१६ पासून मानधन निवड समितीच्या सदस्यांचा बैठक भत्ताही थकित असल्याची माहिती समिती सदस्य दयाल कांबळे यांनी दिली. त्यांनी सांगितले की फेब्रुवारी २०१४ च्या शासन निर्णयानुसार शासनाच्या बांधकाम, कृषी, समाज कल्याण आदी समित्यांप्रमाणे लोककलावंतांच्याही समितीला प्रवास भत्ता व बैठक भत्ता लागू आहे. मात्र सदस्यांना आजपर्यंत त्याचा लाभ मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Governmentसरकार