शहरं
Join us  
Trending Stories
1
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
2
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
3
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
4
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
5
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
6
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
7
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
8
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
9
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
10
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
11
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
12
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
13
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
14
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
15
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
16
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
17
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
18
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
19
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
20
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत

मनपा शाळांची खेळातील कामगिरी सुधारण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:55 IST

नागपूर महानगरपालिकेच्या शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना क्र ीडा क्षेत्रात मोठी झेप घेता यावी, ...

क्रीडा सभापती : मुख्याध्यापक आणि शारीरिक शिक्षकांची जाणून घेतली मतेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना क्र ीडा क्षेत्रात मोठी झेप घेता यावी, यासाठी शारीरिक शिक्षण तज्ज्ञांच्या सहकार्याने कामगिरी सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचा मानस मनपा क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी व्यक्त केला.यासंदर्भात मनपा शाळांचे मुख्याध्यापक आणि शारीरिक शिक्षकांची बैठक मनपा मुख्यालयात सोमवारी झाली. बैठकीला सत्तापक्ष नेते संदीप जोशी, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्र ीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, झोन सभापती संजय चावरे, नगरसेवक सुनील हिरणवार, प्रदीप पोहाणे, दिनेश यादव, नगरसेविका नेहा वाघमारे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, क्र ीडा निरीक्षक नरेश चौधरी, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर उपस्थित होते.मनपाच्या अनेक शाळांना मैदाने नाहीत. जिथे मैदान आहेत त्या मैदानाचे सपाटीकरण नाही, जिथे उत्कृष्ट मैदान आहे त्या शाळांत शारीरिक शिक्षण शिक्षक नाहीत. त्यामुळे मनपा शाळांतील क्र ीडा विभागाचा आलेख उंचवायचा असेल तर मूलभूत सोयी असणे गरजेचे आहे.ज्या शाळांना मैदाने नाहीत त्या शाळांमध्ये कॅरम, बुद्धिबळ अशा खेळांसाठी चांगले प्रशिक्षक उपलब्ध करून दिल्यास किमान इन्डोअर गेममध्ये विद्यार्थ्यांना निपुण करता येईल, अशीही सूचना शिक्षकांनी केली. काही शिक्षकांनी मनपाची स्पोर्टस् स्कूल यशवंत स्टेडियम येथे सुरू करण्याची सूचना केली तर काहींनी वार्षिक क्रीडा कॅलेंडर तयार करण्याचे आवाहन केले.‘महापौर चषका’अंतर्गत विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये मनपा शाळांचा सहभाग वाढविण्याची सूचना दिलीप दिवे यांनी केली. संदीप जोशी यांनी नव्या जोमाने काम करण्यास सज्ज होण्याचे आवाहन केले.आज क्र ीडा संस्था पदाधिकाऱ्यांची बैठकमनपाद्वारा होणाऱ्या क्र ीडा स्पर्धा आयोजनासाठी विविध क्र ीडा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे मत घेण्यासाठी आज मंगळवार १८ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता मनपा मुख्यालयात पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन सहारे यांनी केले आहे.