शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पारडीतील निर्माणाधीन उड्डाणपूल ठरतोय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 20:52 IST

पारडी येथील उड्डाणपुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. कामाची गती लोकांसाठी धोकादायक ठरली आहे. रस्ता जागोजागी खोदून ठेवला आहे. यात पावसाचे पाणी साचत आहे. इतकेच नाही तर रस्त्यावर माती पसरली आहे. त्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांना येथून आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर पसरली माती : पावसात अपघाताचा धोका वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पारडी येथील उड्डाणपुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. कामाची गती लोकांसाठी धोकादायक ठरली आहे. रस्ता जागोजागी खोदून ठेवला आहे. यात पावसाचे पाणी साचत आहे. इतकेच नाही तर रस्त्यावर माती पसरली आहे. त्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांना येथून आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.पारडी चौकात २४ तास जड वाहनांची वर्दळ असते. पारडी उड्डाणपुलाचे व सोबत मेट्रो रेल्वेचे कामही सुरू आहे. या दोन्ही कामांमुळे या रस्त्याने वाहन चालकांसह पायी जाणाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. दर दिवशी अपघात होत असतात. लोकमतने येथील समस्या अनेकदा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. परंतु राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि महापालिका या दोघांचेही याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.या ठिकाणी सुरक्षा मानकाकडे अजिबात लक्ष देण्यात आलेले नाही. हनुमान मंदिरसमोरच्या रस्त्यावर उड्डाणपुलाचा उतार आहे. तेथील रस्ता सहा महिन्यापासून खोदून तसाच सोडलेला आहे. यात आतापर्यंत सहा फुटापर्यंत पाणी जमा झाले आहे. १२० मीटर रुंद असलेल्या पारडी चौकाची ओळखच बनलेली आहे. जागोजागी खड्डे, मातीचे ढिगारे, गिट्टी, अर्धवट अवस्थेतील पिल्लर अशी अवस्था आहे. गेल्या सहा वर्षांपासून या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. परंतु आतापर्यंत केवळ ४० टक्केच काम झाले आहे. भंडारा रोड जिथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे तेथील रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून येथून ये-जा करावी लागत आहे. लॉकडाऊनमध्ये तीन महिन्यापर्यंत सर्वच बंद असल्याने नागरिकांना त्रास झाला नाही. परंतु आता सर्व व्यवहार सुरू असल्याने आणि पावसाळा वाढल्याने अडचणी जास्त वाढल्या आहेत. अपघाताचा धोका वाढला आहे.पावसाळ्याने वाढला त्रासपारडी येथील प्रेमचंद मेश्राम यांनी सांगितले की, निर्माणाधीन उड्डाणपुलामुळे मोठा त्रास आहे. यात पावसाळा सुरू झाल्याने हा त्रास आणखीनच वाढला आहे. या जागेतून वाहन घेऊन जाणे मोठ्या जिकिरीचे आहे. थोडेही लक्ष विचलित झाले की, अपघात झालाच म्हणून समजा. या उड्डाणपुलाने आतापर्यंत अनेकांचे जीव घेतले आहे. पारडी चौकातून जात असलेल्या नेताजीनगर येथील रामेश्वर शुक्ला यांनी सांगितले की, १२० मीटर रुंद असलेल्या या चौकाची आता ओळखच संपली आहे. रस्त्यावर माती व गिट्टी जमा झाल्याने दुचाकी वाहन चालकांसाठी येथून गाडी चालवणे धोकादायक झाले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरTrafficवाहतूक कोंडी