शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पातळी खोलात गेल्यामुळे फ्लोराईड वाढले : यवतमाळ जिल्ह्यातील परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 21:38 IST

यवतमाळ जिल्ह्यातील भूजल पातळी खोलात गेल्यामुळे पाण्यामधील फ्लोराईडचे प्रमाण वाढले आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)ने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. तसेच, भूजल पातळी वाढविणे हा या समस्येवर उपाय असल्याचे सांगितले.

ठळक मुद्दे‘एमपीसीबी’ची हायकोर्टात माहिती

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील भूजल पातळी खोलात गेल्यामुळे पाण्यामधील फ्लोराईडचे प्रमाण वाढले आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)ने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. तसेच, भूजल पातळी वाढविणे हा या समस्येवर उपाय असल्याचे सांगितले.यासंदर्भात देवानंद पवार यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, ‘एमपीसीबी’ने ही शास्त्रीय बाजू स्पष्ट केली. त्यानंतर राज्य सरकारने उपाययोजनांची माहिती दिली. फ्लोराईडचे अतिरिक्त प्रमाण आढळून आलेल्या दोन बोअरवेलवर लाल खूण करण्यात आली आहे. त्या बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरू नये अशी सूचना नागरिकांना करण्यात आली आहे. तसेच, संबंधित नागरिकांना पाईप लाईनद्वारे पिण्यायोग्य पाणी पुरविले जात आहे असे सरकारने सांगितले. न्यायालयाने हे मुद्दे रेकॉर्डवर घेऊन प्रकरणावरील सुनावणी आठ आठवडे तहकूब केली.यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे ५०० लोकवस्त्यांमध्ये नागरिकांना फ्लोराईडयुक्त पाणी वापरावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. हाडे ठिसुळ होणे, दात खराब होणे, किडनीचे आजार इत्यादी आरोग्यविषयक समस्या वाढल्या आहेत. २०१३ मध्ये केंद्र सरकारच्या जलसंसाधन मंत्रालयाने फ्लोराईडयुक्त पाणी धोकादायक असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या अभ्यासाचा उल्लेख होता. भूजल सर्वेक्षण व विकास विभागाने राज्यातील अनेक भागांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी असल्याचे म्हटले आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्याचा उल्लेख आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील १४ जणांचा किडनीच्या आजारामुळे मृत्यू झाला असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. मंडळातर्फे अ‍ॅड. एस. एस. सन्याल यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयWaterपाणीYavatmalयवतमाळ