शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

नागपुरातील पूर ठरला जीवघेणा, महिलेचा आढळला मृतदेह

By योगेश पांडे | Updated: July 21, 2024 18:15 IST

या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

नागपूर: शनिवारी नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे केवळ नागपूर महानगरपालिकेच्या कामाचीच पोलखोल झाली नाही तर ह पूर जीवघेणादेखील ठरला. एका वृद्धा पाण्यात वाहून गेली व तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह रविवारी आढळला. बेलतरोडी व कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या असून प्रशासनाविरोधात नागरिकांचा प्रचंड रोष आहे.

श्रीहरी सोसायटी, नरेंद्रनगरमध्ये राहणाऱ्या सुधा विश्वेश्वर वेरुळकर (७०) या शनिवारी सायंकाळी बेसा-बेलतरोडी नाल्यातील पाणी बघायला गेल्या होत्या. त्यांचा पाय घसरून त्या पाण्यात पडल्या व वाहून गेल्या. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी पुराच्या पाण्यात त्यांचा शोध घेतला. मात्र अंधारात त्यांना यश आले नाही. रविवारी हुडकेश्वरमधील श्यामनगरातील नाल्यात सुधा यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यांना मानसिक त्रास होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुरात उडी घेतलेल्याचा आढळला मृतदेहतर शनिवारी नागनदीच्या पुरात वाहून गेलेले भोजराज धुलीचंद पटले (५२, रा. शामनगर, पुनापूर) यांचा मृतदेहदेखील सापडला. ते ऑटोमोटिव्ह चौकातील टाटा मोटर्समध्ये मेकॅनिक म्हणून कार्यरत होते. शनिवारी नागनदी दुथडी भरून वाहत होती. सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान भोजराज यांनी भरतवाडा पुलाजवळ दुचाकी उभी केली. त्यानंतर ते पुलावर चढला आणि पाण्यात पडले. काहींनी त्यांनी उडी घेतल्याचा दावा घेतला होता. तेथील काही लोक भोजराजला ओळखत होते. त्यांनी तातडीने नियंत्रण कक्षाला याची सूचना दिली.

त्यानंतर कळमना पोलीस व एनडीआरएफच्या (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल) पथकाने भोजराजचा शोध घेतला. रात्री उशीरापर्यंत एनडीआरएफचे पथक भोजराजचा शोध घेत होते. रविवारी सकाळी तीन किमी अंतरावर भोजराज यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरण कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :floodपूरnagpurनागपूर