शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तलावांमधील कचरासफाईसाठी ‘फ्लोटिंग सायकल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:47 IST

‘स्वच्छ भारत’ मोहीम देशभरात राबविण्यात येत असताना ‘सीएसआयआर-नीरी’नेदेखील पुढाकार घेतला आहे. तलावांवर तरंगणारा कचरा व विविध वस्तूंचे अवशेष ही पर्यावरण संवर्धनासाठी डोकेदुखीच बनली आहे. हा कचरा काढायला अनेकदा द्राविडी प्राणायमदेखील करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन ‘नीरी’ने पर्यावरण प्रेरणा विदर्भ यांच्या सहकार्याने ‘फ्लोटिंग सायकल’ची निर्मिती केली आहे. ‘इकोफ्रेंडली’ असलेल्या या ‘सायकल’मुळे एकाच वेळी तलावाची सैर व स्वच्छता शक्य होऊ शकणार आहे हे विशेष.

ठळक मुद्दे‘नीरी’चे संशोधन : एकाच वेळी सैर आणि स्वच्छता

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘स्वच्छ भारत’ मोहीम देशभरात राबविण्यात येत असताना ‘सीएसआयआर-नीरी’नेदेखील पुढाकार घेतला आहे. तलावांवर तरंगणारा कचरा व विविध वस्तूंचे अवशेष ही पर्यावरण संवर्धनासाठी डोकेदुखीच बनली आहे. हा कचरा काढायला अनेकदा द्राविडी प्राणायमदेखील करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन ‘नीरी’ने पर्यावरण प्रेरणा विदर्भ यांच्या सहकार्याने ‘फ्लोटिंग सायकल’ची निर्मिती केली आहे. ‘इकोफ्रेंडली’ असलेल्या या ‘सायकल’मुळे एकाच वेळी तलावाची सैर व स्वच्छता शक्य होऊ शकणार आहे हे विशेष.तलावांची सहजपणे स्वच्छता व्हावी या उद्देशातून ‘फ्लोटिंग सायकल’चे ‘डिझाईन’ तयार करण्यात आले आहे. या ‘सायकल’मध्ये ‘प्रोपेलर’देखील असून ‘हँडल’ने दिशा देता येणे शक्य आहे. या ‘प्रोपेलर’मुळे तलावांमध्ये वायुमिश्रणदेखील होते व यामुळे पाण्यामधील प्राणवायूचे प्रमाण वाढायला मदत होते. या प्रक्रियेमुळे तलावाच्या पाण्यात स्व-शुद्धीकरणाची प्रक्रिया होते. या ‘फ्लोटिंग सायकल’मध्ये सुरक्षेचीदेखील तजवीज करण्यात आली असून ‘पीव्हीसी पाईप्स’चा उपयोग करण्यात आला आहे. कचरा गोळा करण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. या ‘सायकल’मध्ये कुठेही इंधनाचा वापर होत नसल्यामुळे तलावाचे प्रदूषण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ‘नीरी’तील संशोधकांनी सांगितले आहे.‘नीरी’च्या संचालक संशोधन सेलच्या प्रमुख डॉ.आत्या कपले, डॉ.रिता धापोडकर व सौरव चक्रबर्ती यांच्या संकल्पनेतून ही ‘फ्लोटिंग सायकल’ तयार झाली आहे. ‘पर्यावरण प्रेरणा विदर्भ’च्या अनसूया काळे, शरद पालीवार, रितेश तहलियानी, शेफाली यांनीदेखील यात मौलिक सहकार्य केले आहे. ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार यांनी या समाजासाठी उपयुक्त असलेल्या या प्रकल्पाला मार्गदर्शन केले.मनपाला सोपविणार ‘फ्लोटिंग सायकल’‘नीरी’ व ‘पर्यावरण प्रेरणा विदर्भ’ यांच्याकडून ही ‘फ्लोटिंग सायकल’ तलावांच्या स्वच्छतेसाठी मनपाला सोपविण्यात येणार आहे. ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार हे मनपाचे आयुक्त अश्विन मुद्गल यांना ही ‘सायकल’ सोपवतील.

टॅग्स :nagpurनागपूरWaterपाणी