शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरपर्यंत उड्डाणासाठी लवकरच मिळणार मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 10:24 IST

रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेंंतर्गत (आरसीएस) जर कोणतीही विमान कंपनी महाराष्ट्रातील छोट्या विमानतळावरून नागपूरपर्यंत उड्डाण संचालन करण्याचा प्रस्ताव देत असेल तर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) त्याला तातडीने मंजुरी देणार आहे.

ठळक मुद्दे‘एमएडीसीची’ तयारी डीजीसीएकडे पाठविण्यात येणार यवतमाळचा प्रस्ताव

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात छोट्या विमानतळावरून विमानांच्या उड्डाणाचे संचालन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेंंतर्गत (आरसीएस) जर कोणतीही विमान कंपनी महाराष्ट्रातील छोट्या विमानतळावरून नागपूरपर्यंत उड्डाण संचालन करण्याचा प्रस्ताव देत असेल तर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) त्याला तातडीने मंजुरी देणार आहे. याअंतर्गत जवाहरलाल दर्डा विमानतळ, यवतमाळला आरसीएसमध्ये सहभागी करण्यासाठी एमएडीसीने नागरी वाहतूक मंत्रालयाला प्रस्ताव पाठविला आहे.एमएडीसीने पहिल्या टप्प्यात पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात राज्यातील नांदेड, जळगाव, नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूर विमानतळाचा आरसीएसमध्ये समावेश केला आहे. या विमानतळांवरून उड्डाणे सुरू झाली आहेत, पण या भागातून नागपूरकरिता विमान सेवा सुरू झालेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मोठे विमानतळ असल्यामुळे आरसीएसमध्ये सहभागी करता येत नाही. पण छोट्या विमानतळावरून नागपुरात विमाने येऊ शकतात आणि येथून प्रवाशांना नेऊ शकतात.राज्यांतर्गत प्रथम टप्प्यात आरसीएसमध्ये मंजूर करण्यात आलेल्या विमानतळावरून जर कोणतीही विमान कंपनी नागपूरपर्यंत उड्डाणाचे संचालन करण्याची इच्छुक असेल तर नागपूरात स्लॉट मिळविण्यात कोणतीही अडचण येणार नाही. यवतमाळ येथे धावपट्टी लहान असल्यामुळे त्यावर छोटे विमान उतरू शकतात. या धावपट्टीचा विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे, पण त्यावर अजूनही विचार झालेला नाही.आरसीएसमध्ये सहभागी करण्याच्या दुसऱ्या टप्प्यात लातूर, अकोला, अमरावती या शहरांचा समावेश आहे. योजनेंतर्गत नांदेड, औरंगाबाद आणि जळगाव येथून नागपूरकडे हवाईसेवा सुरू होत असेल तर कंपन्यांना पर्याप्त प्रवासी मिळू शकतात, शिवाय तिकीट दर कमी राहतील.

आठ दिवसांच्या नोटीसवर देणार मंजुरीराज्यात आरसीएस योजनेंतर्गत विमानाचे संचालन करणाऱ्या लहान विमानतळाकडून जर नागपूरकरिता प्रस्ताव पाठविण्यात येत असेल तर त्याला लवकरच मंजुरी देण्यात येईल. एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियातर्फे जर आठ दिवसांपूर्वी नोटीस दिला असेल तर संबंधित विमान कंपनीला नागपूर विमानतळावर स्लॉट देण्यात येईल. यवतमाळला आरसीएसमध्ये सहभागी करण्यासाठी नागरी वाहतूक मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.- सुरेश काकाणी, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी.

टॅग्स :Airportविमानतळ