शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत उड्डाणासाठी तयार विमानाचे उड्डाण रद्द : नागपूर विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 20:56 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सकाळी मुंबईहून नागपूरकडे उड्डाणासाठी धावपट्टीवर तयार असलेले एअर इंडियाचे एआय ६२७ विमान अचानक रद्द करण्यात आले.

ठळक मुद्दे एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सकाळी मुंबईहून नागपूरकडे उड्डाणासाठी धावपट्टीवर तयार असलेले एअर इंडियाचे एआय ६२७ विमान अचानक रद्द करण्यात आले. विमानात तांत्रिक बिघाड आल्यामुळे एअरलाईन्सने विमान रद्द करण्याचा निर्णय घेतला.या विमानात नागपुरातील ७६ प्रवासी होते. नागपूर विमानतळावर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना विमानाचे उड्डाण मुंबईत रद्द झाल्याचे कळताच त्यांनी काहीवेळ गोंधळ घातला. प्राप्त माहितीनुसार, नागपूरकडे येणारे प्रवासी विमानात बसले होते. हे विमान मुंबईहून सकाळी ६.०५ वाजता रवाना होण्यासाठी धावपट्टीवर तयार होते. पण वैमानिकांना विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे आढळून आले. त्यांनी उड्डाणास नकार दिला.हे विमान नागपुरात पोहोचल्यानंतर एआय ६२८ बनून ७.४५ वाजता रवाना होते. नागपूर विमानतळावर या विमानाचे प्रवासी वाट पाहत होते. विलंबानंतरही विमान न आल्यामुळे नागपूर विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर संपर्क साधला. तेव्हा विमानाचे उड्डाण रद्द झाल्याचे कळले. त्यानंतर नागपुरात एअर इंडिया एअरलाईन्सतर्फे विमानाचे उड्डाण रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली आणि प्रवाशांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. या दरम्यान बहुतांश प्रवाशांना सकाळी ९ ते १० दरम्यानच्या गो एअर आणि इंडिगोच्या विमानाचे तिकीट घेण्याचा सल्ला देण्यात आला. यादरम्यान अनेक प्रवासी नाराज झाले अणि त्यांनी काऊंटरवरील कर्मचाऱ्यांशी वाद घातला. कर्मचाऱ्यांनी स्टेशन व्यवस्थापक वसंत बरडे यांना बोलविले. त्यांनी असंतुष्ट प्रवाशांना समजविले. काही प्रवाशांना एअर इंडियाच्या रात्री ९.२० विमानाने मुंबईला पाठविण्यात आले.दुसऱ्या विमानाची व्यवस्था नाहीशासकीय एअरलाईन्स एअर इंडियाचे एआय ६२७ विमान रद्द केल्यानंतर मुंबईसारख्या मोठ्या शहरातून कंपनीने प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था केली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एअर इंडियाची दोन विमाने पूर्वीपासूनच जागेवर उभी असल्यामुळे उड्डाणासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर