शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात ११ पंचायत समित्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 11:19 IST

नागपूर जिल्ह्यातील तेराही पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदासाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. यात जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांवर कॉँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आघाडीचे सभापती, उपसभापती विजयी झाले.

ठळक मुद्देकुही, कामठी भाजपकडे मौद्यात काँग्रेस-सेना एकत्ररामटेकमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग फसला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील तेराही पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदासाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. यात जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांवर कॉँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आघाडीचे सभापती, उपसभापती विजयी झाले. कामठीत पंचायत समितीत ईश्वर चिठ्ठीने भाजपला सभापतिपद मिळाले तर कुहीत भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली. मौदा पंचायत समितीत काँग्रेस-सेना एकत्र येत सत्ता स्थापन केली. रामटेकमध्ये मात्र स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग फसला.जिल्ह्यातील १३ तालुक्याच्या ११६ पंचायत समिती गणाचे निवडणूक निकाल ८ जानेवारी रोजी जाहीर झाले होते. यात काँग्रेसला (५९), राष्ट्रवादी (२३), भाजप (२४), शिवसेना (३), शेकाप (१) आणि दोन जागावर इतर आघाडीचे उमेदवार विजयी झाले होते.१३ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार पंचायत समिती सभापती आणि उपसभापतिपदाची निवड घेण्यात आली. यात ८ पंचायत समितीच्यावर काँग्रेस, २ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस, एका पंचायत समितीवर शेकाप आणि दोन पंचायत समितीवर भाजपचे सभापती विराजमान झाले. नरखेड पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला संवर्गासाठी राखीव आहे. येथे आठही जागावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नीलिमा रेवतकर यांची सभापती तर वैभव दळवी यांची उपसभापतिपदी अविरोध निवड झाली. काटोल पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण अनुसूचित जाती संवर्गासाठी राखीव आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस (५), काँग्रेस (१) आणि शेकापचा (१) उमेदवार विजयी झाला आहे. या तिन्ही पक्षाच्या आघाडीजवळ बहुमत असल्याने शेकापचे धम्मपाल खोब्रागडे यांची सभापतिपदी तर राष्ट्रवादीच्या अनुराधा अनुप खराडे यांची उपसभापतिपदी अविरोध निवड झाली. कळमेश्वर पंचायत समितीच्या सहाही जागावर काँग्रेसने विजय मिळविला आहे. त्यामुळे सर्वसाधारण संवर्गासाठी राखीव असलेल्या सभापतिपदी काँग्रेसचे श्रावण भिंगारे तर उपसभापतिपदी जयश्री वाळके यांची अविरोध निवड झाली आहे. सावनेर पंचायत समितीच्या बाराही जागावर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. सभापतिपद सर्वसाधारण महिला संवर्गासाठी राखीव आहे. कॉँग्रेसच्या अरुणा शिंदे यांची सभापतिपदी तर प्रकाश पराते यांची उपसभापतिपदी अविरोध निवड झाली. पारशिवनी पंचायत समितीच्या आठपैकी सहा जागावर काँग्रेसला विजय मिळाला आहे. त्यामुळे बहुमताच्या बळावर अनुसूचित जाती महिला संवर्गासाठी राखीव असलेल्या सभापतिपदी काँग्रेसच्या मीना कावळे तर उपसभापतिपदी चेतन देशमुख यांची अविरोध निवड झाली आहे. रामटेक पंचायत समितीच्या एकूण दहा जागापैकी पाच जागेवर काँगे्रस, शिवसेना (४) आणि एका जागेवर भाजपचा विजय झाला आहे. येथे नामाप्र (महिला) संवर्गासाठी राखीव असलेल्या सभापतिपदी काँग्रेसच्या कला उमेश ठाकरे तर उपसभापतिपदी रवींद्र कुमरे विजयी झाले. मौदा पंचायत समितीच्या १० पैकी पाच जागावर काँग्रेसचे, भाजप (३) आणि शिवसेनेचा दोन जागावर विजय झाला आहे. नामाप्र महिला संवर्गासाठी राखीव असलेल्या सभापतिपदी काँग्रेसच्या दुर्गा ठाकरे तर उपसभापतिपदी शिवसेनेच्या रक्षा थोटे यांची अविरोध निवड झाली. येथे काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्याने बहुमताचा आकडा गाठता आला. नागपूर ग्रामीण पंचायत समितीच्या १२ पैकी सहा जागावर काँग्रेस, राष्ट्रवादी (२), भाजप (३) आणि वंचित बहुजन आघाडीच्या एका उमेदवाराचा विजय झाला आहे. येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीजवळ बहुमत असल्याने अनुसूचित जमाती महिला संवर्गासाठी राखीव असलेल्या सभापतिपदी काँग्रेसच्या रेखा वरठी तर राष्ट्रवादीचे संजय चिकटे यांची उपसभापतिपदी अविरोध निवड झाली. हिंगणा पंचायत समितीच्या १४ पैकी आठ जागावर राष्ट्रवादी तर सहा जागावर भाजपचा विजय झाला आहे. नामाप्र संवर्गासाठी राखीव असलेल्या सभापतिपदी राष्ट्रवादीचे बबनराव अव्हाले तर उपसभापतिपदी सुषमा कावळे विजयी झाल्या. उमरेड पंचायत समितीच्या आठही जागावर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहे. त्यामुळे अनुसूचित जमाती संवर्गासाठी राखीव असलेल्या सभापतिपदी काँग्रेसचे रमेश किलनाके तर उपसभापतिपदी सुरेश लेंडे यांची अविरोध निवड झाली. कुही पंचायत समितीच्या आठपैकी पाच जागावर भाजपला तर तीन जागावर काँग्रेसला विजय मिळाला आहे. त्यामुळे सर्वसाधारण महिला संवर्गासाठी राखीव असलेल्या सभापतिपदी भाजपच्या अश्विनी शिवणकर तर उपसभापती वामन श्रीरामे यांची अविरोध निवड झाली. भिवापूर पंचायत समितीच्या चारपैकी तीन जागावर काँग्रेसचा तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. त्यामुळे नामाप्र संवर्गासाठी राखीव असलेल्या सभापतिपदी काँग्रेसच्या ममता शेंडे तर उपसभापतिपदी कृष्णा घोडेस्वार यांची अविरोध निवड झाली.

कामठीत भाजपला देव पावलाकामठी पंचायत समितीच्या आठ जागापैकी भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी चार जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही पक्षाकडे बहुमत नसल्याने सभापती आणि उपसभापतिपदाची ईश्वर चिठ्ठीने निवड करण्यात आली. यात भाजपचे उमेश रडके यांची सभापती तर काँग्रेसचे आशिष मल्लेवार यांची उपसभापतिपदी निवड करण्यात आली.

टॅग्स :Electionनिवडणूक