शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पाच पोलीस अधिकारी-कर्मचारी शासकीय सेवेतून बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:33 IST

सांगली शहर पोलीस ठाण्यातील कोठडीत जबर मारहाण झाल्याने अनिकेत कोथळे याच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह दोन पोलीस हवालदार, एक पोलीस शिपाई आणि एक पोलीस वाहन चालक अशा एकूण पाच जणांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

ठळक मुद्देअनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली माहिती

ऑनलाईन लोकमतनागपूर : सांगली शहर पोलीस ठाण्यातील कोठडीत जबर मारहाण झाल्याने अनिकेत कोथळे याच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह दोन पोलीस हवालदार, एक पोलीस शिपाई आणि एक पोलीस वाहन चालक अशा एकूण पाच जणांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.कवलापूर ता. मिरज जि. सांगली येथील अभियंता संतोष गायकवाड यांची फसवणूक केल्याप्रकरणी अनिकेत कोथळे व सुनील भेंडारे रा. भारतनगर या दोघांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली होती. अटकेत असलेला आरोपी अनिकेत कोथळे यास पोलिसांनी जबर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. पोलीस कोठडीत मरण पावल्याने हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांनी कोथळे याचा मृतदेह आंबोली जि. सिंधुदुर्ग या घाटात नेऊन जाळल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सखोल तपास सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या तपासात सांगली शहर पोलीस स्टेशन येथील एक पोलीस उपनिरीक्षक, दोन पोलीस हवालदार, एक पोलीस शिपाई, एक वाहन चालक व एक खासगी इसम यांचा या गुन्ह्यात समावेश असल्याचे आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली असून सर्व आरोपी न्यायालयीन काठोडीत आहेत.सदस्य संतोष दानवे, नारायण कुचे, अ‍ॅड. यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, अमर काळे, असलम शेख, डॉ. संतोष टारफे आदींनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

 

टॅग्स :PoliceपोलिसSangliसांगली