लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टिमकी भानखेडा येथील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर आलमारी चढवण्याच्या प्रयत्नात पाच लोकांना करंट लागला. सर्व जखमींना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वीज वितरण कंपनी एसएनडीएलने सांगितले की, विजेच्या लाईनजवळून बांधकाम हटवण्याचे नोटीस देण्यात आले होते. परंतु इमारत मालकाने यादिशेने कुठलेही पाऊल उचलले नाही. या घटनेमुळे नागरिकांमध्ये रोष पसरला आहे. सायंकाळी पाऊस थोडा कमी झाल्यानंतर रात्री ८.१७ वाजता हुसैन टेलर यांच्या इमारतीमध्ये वरच्या माळ्यावर आलमारी घेऊन जाण्याचा प्रयत्न होत होता. या दरम्यान आलमारी विजेच्या तारांच्या संपर्कात आली. त्यामुळे आलमारी धरून असलेले पाच जणांना करंट लागला. यात मो. हुसैन मो. शब्बीर, मो. अनीस मो. अनवर उमर, मो. सलीम आणि शुभम यांचा समावेश आहे. या सर्वांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तहसील पोलीस तपास करीत आहे.
आलमारी वर घेऊन जाणाऱ्या पाच जणांना लागला करंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 23:50 IST
टिमकी भानखेडा येथील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर आलमारी चढवण्याच्या प्रयत्नात पाच लोकांना करंट लागला. सर्व जखमींना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वीज वितरण कंपनी एसएनडीएलने सांगितले की, विजेच्या लाईनजवळून बांधकाम हटवण्याचे नोटीस देण्यात आले होते. परंतु इमारत मालकाने यादिशेने कुठलेही पाऊल उचलले नाही. या घटनेमुळे नागरिकांमध्ये रोष पसरला आहे.
आलमारी वर घेऊन जाणाऱ्या पाच जणांना लागला करंट
ठळक मुद्देनागपूरच्या टिमकीतील घटना