शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

पाच मिनिटे लेट झाली, विद्यार्थिनी ‘नीट’लाच मुकली; हुंदके आवरेना : विनंती करूनही दिला नाही प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 07:08 IST

शेवटी परीक्षेला मुकलीच आणि वर्षभर ज्यासाठी परिश्रम घेतले, तेच गमावल्याने तिचा हुंदका दाटून आला. 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘नीट’चे परीक्षा केंद्र गाठण्यासाठी काटाेलहून धावपळीचा प्रवास करताना ऐनवेळी गाडीने दगा दिला. ती ऑटाे पकडून कशीबशी धापा टाकत परीक्षा केंद्रापर्यंत पाेहोचली पण तेव्हा दुपारची १:३५ मिनिटे झाली. म्हणजे निर्धारित वेळेपेक्षा तिला ५ मिनिटे उशीर झाला. ती केंद्र चालकांना विनंती करू लागली, अक्षरश: रडू लागली पण त्यांना पाझर फुटला नाही. ती शेवटी परीक्षेला मुकलीच आणि वर्षभर ज्यासाठी परिश्रम घेतले, तेच गमावल्याने तिचा हुंदका दाटून आला. 

गाडी पंक्चर झाली... ऑटाेने केंद्राकडे निघाली  रविवारी नीटची परीक्षा हाेती. काटाेल येथे राहणाऱ्या भाविकाने यासाठी वर्षभर तयारी केली हाेती. सकाळी ती बहिणीसाेबत गाडीने नागपूरच्या केंद्राकडे निघाली. मात्र तिची गाडी पंक्चर झाली. तिथे वेळ घालविण्यापेक्षा ती ऑटाेने केंद्राकडे निघाली. मात्र वेळेत पाेहोचायला तिला यश आले नाही. तिने शिक्षकांना, केंद्र चालकांना काकुळतीला येऊन प्रवेशाची विनंती केली, पण ते मानायला तयार झाले नाही.

उड्डाणपुलावरून पडून विद्यार्थिनीचा मृत्यूबुटीबोरी (जि. नागपूर) : नीट परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थिनीचा बुटीबाेरी शहरातील उड्डाणपुलावरून काेसळून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्री १:३० ते २ वाजेच्या दरम्यान घडली. तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे.नीलिमा अखिलेश साहू (वय १९) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. शनिवारी रात्री मध्यरात्री उड्डाणपुलाच्या खाली अनाेळखी तरुणी जखमी अवस्थेत आढळली. तिला हाॅस्पिटलमध्ये नेले. मात्र, तिला मृत घाेषित केले.