शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट चोरीमुळे मनपाला दररोज पाच लाखांचा फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 21:42 IST

चोरीसाठी आपली बसच्या कंडक्टर व चालकांनी मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप ‘कंडक्टर सेटअप  ग्रुप’ बनविला आहे. या माध्यमातून आपली बसच्या तिकीट चेकर्सच्या लोकेशनची माहिती एकमेकांना देऊन तिकीट चोरी केली जाते. यामुळे महापालिकेला दररोज ४ ते ५ लाखांचा फटका बसत आहे.

ठळक मुद्दे‘कंडक्टर सेटअप ग्रुप’सक्रिय : आठवडाभरात आठ कंडक्टर निलंबित

लोकमत न्यूच नेटवर्कनागपूर : शहर बसची जबाबदारी वंश निमय यांच्याकडे असताना शहरात २०० बस धावत असताना दररोज २० ते २५ लाखाचे उत्पन्न होत होते. आता शहरात ३३७ बस धावत असूनही तिकीटातून दररोज १८ ते २२ लाखांचे उत्पन्न होत आहे. तिकीट चोरीसाठी आपली बसच्या कंडक्टर व चालकांनी मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप ‘कंडक्टर सेटअप  ग्रुप’ बनविला आहे. या माध्यमातून आपली बसच्या तिकीट चेकर्सच्या लोकेशनची माहिती एकमेकांना देऊन तिकीट चोरी केली जाते. यामुळे महापालिकेला दररोज ४ ते ५ लाखांचा फटका बसत आहे.बस कर्मचाऱ्यांनी अवैध व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप सुरू केले आहेत. या माध्यमातून तिकीट चोरी केली जाते. चोरी प्रकरणात सापडलेल्या सात कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे. यापुढे तिकीट चोरी प्रकरणात कंडक्टरचा सहभाग आढळून आल्यास त्यांना नोकरीतून बडतर्फ क रण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी दिली. तोटा कमी करण्यासाठी तिकिटांचा गैरव्यवहार रोखणे आवश्यक आहे. यासाठी चेकर्सची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परंतु चेकर्सलाही धमक्या येतात. त्यांना मारहाण केली जाते. अशा कंडक्टर व चालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.डीम्स कंपनीने भरारी पथक तयार केले आहेत. या पथकांच्या माध्यमातून आपली बसची तपासणी केली जाते. परंतु या कामात कंडक्टर व चालकांकडून सहकार्य मिळत नाही. गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांकडून या कारवाईला विरोध केला जातो. प्रवाशांनी कंडक्टरला पैसे दिल्यानंतर तिकीट मागावे, तिकीट देण्यास नकार दिल्यास मनपाच्या परिवहन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन बाल्या बोरकर यांनी केले आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वीही अवैध व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप आढळून आला होता. दोषीवर क ठोर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु प्रकरण दडपण्यात आले होते. यासंदर्भात विचारणा करता त्यावेळी मी पदावर नव्हतो, असे बोरकर म्हणाले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPublic Transportसार्वजनिक वाहतूकticketतिकिटtheftचोरी