शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत कडाक्याच्या थंडीचे १२ तासात पाच बळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 10:19 IST

उपराजधानीत कडाक्याच्या थंडीने अवघ्या १२ तासात चार निराधारांचे बळी घेतले. मृत झालेल्या चारही वृद्धांची ओळख पटलेली नाही.

ठळक मुद्देचार निराधार वृद्धांनी सोडले उघड्यावर जीव पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कडाक्याच्या थंडीने अवघ्या १२ तासात चार निराधारांचे बळी घेतले. मृत झालेल्या चारही वृद्धांची ओळख पटलेली नाही. एमआयडीसी, कळमना, तहसील आणि अजनी पोलीस ठाण्यात शनिवारी या घटनांची नोंद अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली, तर रविवारी सकाळी ताजबाग परिसरात एका वृद्धाचा मृतदेह आढळला.शनिवारी पहाटे एमआयडीसीतील तकियावाले बाबा दर्ग्याजवळ सुमारे ८० वर्षांच्या वृद्धाचा मृतदेह आढळला. त्यानंतर सकाळी १० वाजताच्या सुमारास कळमन्यातील विद्यार्थी वसतिगृहाजवळ एक ६० वर्षीय वृद्ध मृतावस्थेत आढळला. दुपारी ४ च्या सुमारास मेयोतील आकस्मिक तपासणी कक्षाजवळ एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला, तर अजनी रेल्वेच्या आरक्षण कार्यालयाजवळ ७५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला. हे चारही वृद्ध निराधार आणि अनोळखी आहेत. ते उघड्यावरच राहून मिळेल ते खात होते. हक्काचा निवारा नसल्याने आणि आप्तस्वकीय काळजी घ्यायला जवळ नसल्याने कडाक्याच्या थंडीत ते रात्र काढायचे. गेल्या आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढल्याने या चारही जणांचा बळी गेला. त्याचप्रमाणे मोठा ताजबाग परिसरातील रहिवासी नारायण महादेवराव जगराळे (वय ६३) हे रविवारी सकाळी लहान ताजबाग परिसरात मृतावस्थेत आढळून आले. एमआयडीसी, कळमना, तहसील आणि अजनी तसेच सक्करदरा पोलिसांनी हे कडाक्याच्या थंडीचे बळी आहेत की नाही, ते स्पष्ट केले नाही. त्यांची पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यू