शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दोन दिवसात स्वाईन फ्लूचे पाच बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 22:33 IST

‘स्वाईन फ्लू’बाबत सध्या सगळीकडे धोक्याची घंटा वाजवली जात आहे. एकीकडे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या दोन दिवसात पाच मृत्यूची नोंद झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. सध्या शहरात जानेवारी ते आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १३ मृत्यू व १६९ रुग्ण आढळून आले आहे. धक्कादायक म्हणजे, पहिल्यांदाच सात वर्षीय मुलगा स्वाईन फ्लू ‘पॉझिटीव्ह’ आला आहे.

ठळक मुद्देशहरात मृत्यूचा आकडा १३ : रुग्णांची संख्या १६९वर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘स्वाईन फ्लू’बाबत सध्या सगळीकडे धोक्याची घंटा वाजवली जात आहे. एकीकडे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या दोन दिवसात पाच मृत्यूची नोंद झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. सध्या शहरात जानेवारी ते आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १३ मृत्यू व १६९ रुग्ण आढळून आले आहे. धक्कादायक म्हणजे, पहिल्यांदाच सात वर्षीय मुलगा स्वाईन फ्लू ‘पॉझिटीव्ह’ आला आहे.तापमान वाढत असतानाही स्वाईन फ्लूचा जोर कमी झालेला नाही. दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्यातच स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण दिसून आले होते. उपलब्ध माहितीनुसार, नागपूर विभागात जानेवारी ते १४ मार्च पर्यंत २२४ रुग्ण व १३ मृत्यूची नोंद होती. यात नागपूर शहरात रुग्णांची संख्या १५३ तर मृत्यूची संख्या ८ होती. परंतु दोन दिवसांत मृत्यूच्या संख्या ५ ने वाढली आहे तर रुग्णांची संख्या १६ ने वाढली आहे. मेडिकलमध्ये शनिवारी उपलब्ध झालेल्या स्वाईन फ्लूच्या अहवालात आणखी एक ३८ वर्षीय महिला पॉझिटीव्ह आली आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना या रुग्णांच्या सेवेत असलेले मेयो, मेडिकल व महापालिकेचे बहुसंख्य डॉक्टरांसह, परिचारिका, कर्मचारी यांना अद्यापही स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस देण्यात आलेली नाही. उल्लेखनीय म्हणजे, मेडिकलमध्येच सहावर डॉक्टरांना स्वाईन फ्लूचे निदान झाल्याची माहिती आहे.बालरोग विभागात सात वर्षीय रुग्णयुवा व ज्येष्ठांमध्ये दिसून येणारा हा आजार आता मुलांमध्येही दिसून येऊ लागला आहे. मेडिकलच्या बालरोग विभागात नुकताच सात वर्षीय रुग्ण स्वाईन फ्लू पॉझिटीव्ह आला. या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. दीप्ती जैन यांनी सांगितले. सोबतच त्यांनी ताप, खोकला, सर्दी, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणे किंवा दुखणे आणि थंडी भरुन येणे अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांना दाखविण्याचे आवाहन केले आहे.

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयDeathमृत्यू