शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळ्यात पाच आरोपींना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:27 IST

सत्र न्यायालयाने शुक्रवारी सिंचन घोटाळ्यातील पाच आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला. हा घोटाळा गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेंतर्गतच्या नक्षी शाखा कालवा, त्यावरील चार वितरिकेचे मातीकाम, बांधकाम व अस्तरीकरणाशी संबंधित आहे.

ठळक मुद्देसत्र न्यायालय : गोसेखुर्दशी संबंधित प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने शुक्रवारी सिंचन घोटाळ्यातील पाच आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला. हा घोटाळा गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेंतर्गतच्या नक्षी शाखा कालवा, त्यावरील चार वितरिकेचे मातीकाम, बांधकाम व अस्तरीकरणाशी संबंधित आहे.जामीन मिळालेल्या आरोपींमध्ये अंभोरा उपसा सिंचन विभाग भिवापूरचे तत्कालीन सचिव व कार्यकारी अधिकारी उमाशंकर वासुदेव पर्वते, तत्कालीन लेखा अधिकारी चंदन तुळशीराम जिभकाटे, भंडारा जिल्ह्यातील आंबाडी येथील गोसेखुर्द उपसा सिंचन मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता दिलीप देवराव पोहेकर, गोसेखुर्द प्रकल्पाचे तत्कालीन मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक देवेंद्र परशुराम शिर्के यांचा समावेश आहे. या कामाचे कंत्राट हैदराबाद येथील के. के. रेड्डी अ‍ॅन्ड कंपनीला ५८ कोटी ७१ लाख ४३ हजार रुपयात देण्यात आले होते. या कंत्राट वाटपात नंदकुमार वडनेरे कमिटीने अनेक आक्षेप घेतले आहेत. या कंत्राटामुळे सरकारचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तसेच, विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल झाले आहे. आरोपींतर्फे अ‍ॅड. चंद्रशेखर जलतारे व अ‍ॅड. प्रकाश रणदिवे यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :District Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालयIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प