फिटनेसच्या सप्लीमेंटचा अतिडोज

By Admin | Updated: August 15, 2016 01:59 IST2016-08-15T01:59:24+5:302016-08-15T01:59:24+5:30

फिटनेसकरिता घेतल्या जाणाऱ्या औषधाचा (सप्लीमेंट) जास्त डोज घेतल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला

Fitness supplement supplement | फिटनेसच्या सप्लीमेंटचा अतिडोज

फिटनेसच्या सप्लीमेंटचा अतिडोज

महिलेचा मृत्यू : कोतवालीतील घटना
नागपूर : फिटनेसकरिता घेतल्या जाणाऱ्या औषधाचा (सप्लीमेंट) जास्त डोज घेतल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. ईशा मुकुंद मुरारका (वय २९, रा. महावीरनगर, कोतवाली) असे मृत महिलेचे नाव आहे. शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
व्यावसायिक परिवारातील सदस्य असलेल्या ईशा यांचे पती मुकुंद हे वकील आहेत. त्या नेहमी जीममध्ये जात होत्या. जीममधून आल्यानंतर फिटनेससाठी घेतले जाणारे सप्लीमेंट घेत होत्या. नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांनी सप्लीमेंटचा डोज घेतला.
मात्र, तो जास्त झाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना कुटुंबीयांनी उपचाराकरिता खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी ईशा यांना तपासून मृत घोषित केले. मुकुंद हरिराम मुरारका (वय ३८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या घटनेमुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fitness supplement supplement