शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

नागपूर जिल्हा परिषदेच्या तलावांवर मासेमारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 20:54 IST

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे २५० च्या जवळपास तलाव आहे. हे तलाव मासेमारी संस्थांना ठेक्याने देऊन जिल्हा परिषदेला त्यातून महसूल मिळत होता. परंतु २०१७ मध्ये मत्स्य व्यवसाय विभागाने तलावांच्या ठेक्याचे दर वाढविल्याने जिल्ह्यातील मासेमार संस्थांनी लिलाव प्रक्रियेकडे पाठ दाखविली. त्यामुळे २०१८ पासून तलावांवर पूर्णत: मासेमारी बंद असून, मासेमारांचा रोजगारदेखील बुडाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे २५० च्या जवळपास तलाव आहे. हे तलाव मासेमारी संस्थांना ठेक्याने देऊन जिल्हा परिषदेला त्यातून महसूल मिळत होता. परंतु २०१७ मध्ये मत्स्य व्यवसाय विभागाने तलावांच्या ठेक्याचे दर वाढविल्याने जिल्ह्यातील मासेमार संस्थांनी लिलाव प्रक्रियेकडे पाठ दाखविली. त्यामुळे २०१८ पासून तलावांवर पूर्णत: मासेमारी बंद असून, मासेमारांचा रोजगारदेखील बुडाला आहे. मासेमारांना परवडेल असे दर निश्चित करून तलावांची लिलाव प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी मासेमारी संस्थांनी केली आहे.मत्स्य व्यवसाय विभागाने शासननिर्णय काढून तलावाच्या लीजचा दर १८०० रुपये हेक्टर ठरविला होता. १८०० रुपये दराला न्यायालयातही आव्हान देण्यात आले. परंतु जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या तलावांना हा शासन निर्णय लागू पडत नाही, असे परिपत्रक पशू, दुग्ध व मत्स्य विभागाच्या सचिवांनी काढले. या प्रकियेत २ वर्षे लोटून गेले. मासेमारी संस्थांच्या मते दोन वर्षांपासून जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने तलावांचा लिलाव केलेला नाही. त्यामुळे मच्छीमार संस्थांच्या सभासदांचा मागील दोन वर्षापासून रोजगार हिरावला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचा महसूल बुडाला आहे. जिल्हा परिषदेने २०१८ मध्ये मत्स्य व्यवसाय विभागाच्या शासननिर्णयानुसार लघुसिंचन विभागाच्या तलावांची लिलाव प्रक्रिया केली होती. मात्र १८०० रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे दर निश्चित केल्याने लिलाव प्रक्रियेत मच्छीमार संस्थांनी भाग घेतला नाही. लघुसिंचन विभागाचे तलाव बारामाही जलसाठा नसणारे तलाव असून, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापासून कोरडे पडतात. त्यामुळे या तलावात मत्स्य संचयन व संवर्धन करणे संस्थांना परवडत नाही. त्यामुळे १८०० रुपये हेक्टर दर हा मासेमारांना परवडणारा दर नाही. शासनाने जिल्हा परिषदेच्या तलावांच्या बाबतीत भूमिका स्पष्ट केल्यानंतरही जिल्हा परिषदेने तलावांचे लिलाव केले नाहीत. त्यामुळे योग्य तो दर निश्चित करून तलावांचा लिलाव लवकरात लवकर करावा. जेणेकरून मासेमार संस्थांच्या सभासदांना रोजगार उपलब्ध होईल.पुरुषोत्तम बोबडे, अध्यक्षग्रामहित मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या.सर्वसाधारण सभेची प्रतीक्षाशासनाकडून तलावांच्या लिलावाचे दर निश्चित झाले नाहीत. शासनाने सांगितले की जिल्हा परिषद स्वायत्त संस्था आहे. तुम्हीच दर निश्चित करून लिलाव करा. त्यानुसार ४५० रुपये हेक्टर बुडीत क्षेत्राचा दर निश्चित केला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवण्यात येईल. त्यात दर निश्चित झाल्यानंतर लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.बंडू सयाम, जिल्हा जलसंधारण अधिकारी, लघुसिंचन विभाग, जि.प.

टॅग्स :fishermanमच्छीमारNagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर