शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
4
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
5
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
6
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
7
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
8
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
9
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
10
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
11
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
12
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
13
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
14
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
15
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
16
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
17
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
18
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
19
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
20
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले

मेट्रो रेल्वेचा पहिला बळी

By admin | Updated: August 25, 2016 02:12 IST

नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी अनेक दाव्यानंतरही मेट्रो रेल्वे प्रकल्पाने पहिला बळी घेतलाच. वर्धा रोडवर सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या

मजुराच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित : निर्माण स्थळावर वाहतूक नियमांची पायमल्लीनागपूर : नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी अनेक दाव्यानंतरही मेट्रो रेल्वे प्रकल्पाने पहिला बळी घेतलाच. वर्धा रोडवर सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान एका मजुराचा रस्ता अपघातात झालेला मृत्यू याकडेच इशारा करीत आहे. लोकमतने वर्धा रोडवरील त्रासाबद्दल वृत्त प्रकशित करून लक्ष वेधून अपघाताची शंका व्यक्त केली होती. यानंतरही मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन आणि कंत्राटदार कंपनी नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी नागपूरच्या नागरिकांसह आपल्या मजुरांच्या सुरक्षेबाबत वेळीच काळजी घेतली असती तर मंगळवारी झालेल्या अपघातात मजुराचा मृत्यू झाला नसता. आम्ही ज्या मजुराची चर्चा करीत आहोत तो मूळचा छिंदवाडा येथील रहिवासी होता. मारोती ठाकरे (४०) असे त्याचे नाव होते. त्याला तीन मुलं व एक मुलगी आहे. त्याने कधीच हा विचार केला नसेल की, ज्या कामासाठी तो नागपुरात आला आहे, त्याच कामावर त्याचा मृत्यू होईल. पोलिसांच्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी ३.३० वाजता मारोती ठाकरे हा ट्रॅफिक वॉर्डन म्हणून वर्धा रोड येथील साईटवर काम करीत होता. दरम्यान त्याला एका अज्ञात स्कॉर्पियोने जोरदार धडक दिली. यात जखमी झालेल्या ठाकरेला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेच्या तळाशी जाण्याासाठी जेव्हा लोकमत प्रतिनिधीने वर्धा रोडवरील मेट्रो रेल्वे साईटची पाहणी केली तेव्हा तिथे वाहतूक नियमांची घोर पायमल्ली करण्यात आली असल्याची बाब उघडकीस आली. या ठिकाणी बांधकामाचे साहित्य उघड्यावरच पडले आहे. काही ठिकाणी बॅरिकेट्स आढळून आले नाही. वाहतूक पोलीस सुद्धा नव्हते. हल्दीराम शोरूम आणि अजित बेकरीसमोर वाहने कशीही पार्क केल्याने रस्ता आणखीनच अरुंद झाला होता आणि वाहतूक जॅम होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे एनएमआरसीएल आणि वाहतूक पोलीस विभागात समन्वय नसल्याची बाबही दिसून आली. या दरम्यान धंतोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बलराम झाडोकार आणि त्यांची चमू घटनास्थळी दाखल झाली. झाडोकार यांच्यानुसार पोलीस मजुराच्या मृत्यूशी संबंधित प्रत्येक बाबींचा तपास करीत आहे. मजुराच्या मृत्यूला कारणीभूत कोण ?नागपूर : ट्रॅफिक वॉर्डन मारोती ठाकरे याचा मृत्यू मेट्रो रेल्वेचे काम करीत असलेल्या नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या जेसीबी मशीनच्या धडकेने तर झाला नाही ना, असा संशय सुद्धा पोलिसांना आहे. यासाठी पोलिसांनी बुधवारी जेसीबी चालक बिहार निवासी राजेश पाल याचेही बयान घेतले. तसेच जेसीबीच्या टायराचे स्कॅ्रच, स्कीड मार्कचेही फोटो घेतले. या फोटोंना आता तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)एनएमआरसीएलने दिली श्रद्धांजली मजुराच्या मृत्युप्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क/समन्वय) शिरीष आपटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला अतिशय दुर्भाग्यपूर्ण असल्याचे सांगितले. सोबतच बुधवारी सिव्हील लाईन्स स्थित मेट्रो रेल्वेच्या कार्यालयात मृताला श्रद्धांजली देण्यात आली. त्यांनी सांगितले की, मृताच्या कुटुंबीयाना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीसोबत चर्चा केली जाईल. मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी अधिक सावधगिरी बाळगण्यात येईल, असे आश्वासन सुद्धा आपटे यांनी दिले.