शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

सतरंजीपुऱ्यातील सात रुग्ण कोरोनामुक्त : मेडिकलने टाळ्या वाजवून दिला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 22:58 IST

सतरंजीपुऱ्यातील मृताकडून लागण झालेले रुग्ण आता बरे होऊ लागले आहेत. शुक्रवारी मृताचा मुलगा, मुलगी व त्यांच्या कुटुंबातील सात रुग्ण मेडिकलमधून कोरोनामुक्त होऊन घरी गेले.

ठळक मुद्देबरे झालेल्या रुग्णांची संख्या २२

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : सतरंजीपुऱ्यातील मृताकडून लागण झालेले रुग्ण आता बरे होऊ लागले आहेत. शुक्रवारी मृताचा मुलगा, मुलगी व त्यांच्या कुटुंबातील सात रुग्ण मेडिकलमधून कोरोनामुक्त होऊन घरी गेले. एकीकडे नागपुरात कोरोनाच्या रुग्णसंख्येने शंभरी गाठली असताना सात रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. नागपुरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २२ झाली आहे.  सतरंजीपुऱ्यातील ६८ वर्षीय मृताचे नमुने ६ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह येताच खळबळ उडाली. कोरोनाबाधित मृताकडून आतापर्यंत ६० च्यावर लोकांना संसर्ग झाला. त्यांच्या संपर्कात आलेल्या २०० वर संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले. मृताचे नमुने पॉझिटिव्ह येताच ७ एप्रिल रोजी मुलगा, तीन मुलीसह जवळच्या कुटुंबाना क्वारंटाईन केले. ९ एप्रिल रोजी सहा रुग्णाचे तर १० एप्रिल रोजी एका नातेवाईकाचा नमुना पॉझिटिव्ह आला. या सर्वांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. ७ व्या दिवशी आणि १४ व्या दिवशी २४ तासांच्या अंतराने नमुने तपासले असता सर्वांचे तिन्ही नमुने निगेटिव्ह आले. यामुळे शुक्रवारी सायंकाळी ३५ वर्षीय महिला व ३० वषीय पुरुषाला तर रात्री ८ वाजताच्या सुमारास २२, ३४ व ४२ वर्षीय महिलेला आणि १४ वर्षीय मुलासह ४२ वर्षीय पुरुष अशा पाच जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या सर्वांनी मेडिकलच्या सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी व मेट्रन मालती डोंगरे यांनी कोव्हीड वॉर्डात सेवा देणाऱ्यांचे कौतुक केले. सात महिन्याचे बाळही कोरोनामुक्त कोरोना पॉझिटिव्ह आईवडिलांपासून सात महिन्याच्या बाळाला संसर्ग होऊ न देण्याचे आवाहन त्याच्या आईवडिलांपासून ते डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवकांवर होते. या सर्वांनी त्या दृष्टीने परिश्रम घेतले. यामुळे १४ व्या दिवसानंतर आईवडिलांचे नमुने निगेटिव्ह आल्याने हे बाळही कोरोनामुक्त राहूनच घरी जाऊ शकले. मेडिकलच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या डॉक्टरांच्या सेवेला सलाम'कोव्हीड-१९’ वॉर्डातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या सेवेत मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी यांच्यासह डॉ. पंकज घोलप, डॉ. अर्चना अहेर, डॉ.सागर खंडारे, डॉ. प्रति नामजोशी, डॉ. अमृता कडबे, डॉ. मुकुंद उपाध्याय, डॉ. दीपांशू आसुदानी, डॉ. अनंता नरवाडे, डॉ. आदित्य मोरे आदी परिश्रम घेत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय