शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पहिल्यांदाच ‘लाईव्ह डोनर लिव्हर ट्रान्सप्लान्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:03 IST

अवयवदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. नागपुरात अवयवदानासोबतच प्रत्यारोपणाचीही संख्या वाढत आहे. यात मूत्रपिंडासोबत यकृत प्रत्यारोपण होऊ लागले आहे. आतापर्यंत यकृत प्रत्यारोपण हे केवळ ‘ब्रेन डेड’ व्यक्तीच्या अवयवदानातून व्हायचे. सोमवारी पहिल्यांदाच ‘लाईव्ह डोनर लिव्हर ट्रान्सप्लान्ट’ म्हणजे, जिवंत दात्याने दिलेल्या यकृताचे प्रत्यारोपण झाले. यात भावाला त्याच्या छोट्या बहिणीने यकृत दान करून नवे जीवन दिले. विशेष म्हणजे, गरीब मित्रावर ओढवलेल्या या संकटाच्या वेळी मित्र धावून आले. मोठा निधी उभारला. यामुळेच ही शस्त्रक्रिया होऊ शकली.

ठळक मुद्देबहिणीने भावाला दिले जीवनदान : मित्रही आले धावून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवयवदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. नागपुरात अवयवदानासोबतच प्रत्यारोपणाचीही संख्या वाढत आहे. यात मूत्रपिंडासोबत यकृत प्रत्यारोपण होऊ लागले आहे. आतापर्यंत यकृत प्रत्यारोपण हे केवळ ‘ब्रेन डेड’ व्यक्तीच्या अवयवदानातून व्हायचे. सोमवारी पहिल्यांदाच ‘लाईव्ह डोनर लिव्हर ट्रान्सप्लान्ट’ म्हणजे, जिवंत दात्याने दिलेल्या यकृताचे प्रत्यारोपण झाले. यात भावाला त्याच्या छोट्या बहिणीने यकृत दान करून नवे जीवन दिले. विशेष म्हणजे, गरीब मित्रावर ओढवलेल्या या संकटाच्या वेळी मित्र धावून आले. मोठा निधी उभारला. यामुळेच ही शस्त्रक्रिया होऊ शकली.प्रणय कुऱ्हाडकर  (२४) रा. गोळीबार चौक, नागपूर त्या भावाचे नाव. प्रणयचे वडील नरेश हे एका हॉटेलमध्ये काम करीत होते. परंतु काही दिवसांपूर्वीच त्यांच्या हातून हे काम सुटले तर आई माला स्वयंपाकी म्हणून एका हॉटेलमध्ये काम करतात. प्रणय हा मुंजे चौकातील एका कापडाच्या शोरूममध्ये कामाला आहे. त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे शोरूममध्ये त्याचे अनेक मित्र आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती खालावली होती. उपचार सुरू होते. परंतु आजार वाढतच होता. चाचण्या केल्यावर यकृत निकामी झाल्याचे निदान झाले. कुऱ्हाडकर  कुटुंब संकटात सापडले. डॉक्टरांनी तातडीने यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. गरीब कुऱ्हाडकर  कुटुंबाला प्रत्यारोपणाला लागणारा निधी उभा करणे शक्य नव्हते. प्रणयची गंभीर अवस्था पाहता डॉक्टरांनी दोन दिवसात प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. ५ आॅगस्ट रोजी याची माहिती त्याच्या मित्रांना मिळाली. त्यांनी एकमेकांना मोबाईलद्वारे माहिती पोहचवून आर्थिक मदतीचे आवाहन केले आणि पाहता पाहता निधी गोळा होऊ लागला. प्रणयला तातडीने लकडगंज येथील ‘न्यू ईरा हॉस्पिटल’मध्ये यकृत प्रत्यारोपणासाठी भरती केले. यकृत दानासाठी आई समोर आली. परंतु रक्तगट जुळत नव्हता. भावाचा जीव वाचविण्यासाठी २३ वर्षीय बहीण निकिताने पुढाकार घेतला. प्रत्यारोपणासाठी शासनाच्या ‘अवयव प्रत्यारोपण मंजुरी समिती’ची परवानगी आवश्यक असते. परंतु रविवार, सुटीचा दिवस असल्याने परवानगी मिळणे कठीण होते. डॉक्टर, मित्र व कुटुंब अडचणीत आले. प्रयत्न म्हणून सर्वांनीच मेडिकल गाठले. तिथे काही कामानिमित्त अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे आले होते. त्यांना याची माहिती देऊन मदतीची विनंती केली. रुग्णाची गंभीर स्थिती पाहता डॉ. निसवाडे यांनी समितीच्या सदस्यांना बोलवून घेतले. आवश्यक कागदपत्र जमा करण्याच्या अटीवर प्रत्यारोपणाला मंजुरी दिली.सोमवारी सकाळी न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये ‘लाईव्ह डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट’ला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत ही शस्त्रक्रिया सुरू होती. हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना त्यांची शस्त्रक्रिया करीत होते. यात हृदय प्रत्यारोपण सर्जन व हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद संचेती, न्यूरोसर्जन डॉ. नीलेश अग्रवाल व कार्डिओलॉजिस्ट डॉ. निधीश मिश्रा यांनीही सहकार्य केले.न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये आठवे प्रत्यारोपणमध्यभारतात पहिल्यांदाच ‘लाईव्ह डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट’ नागपूरच्या न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये सोमवारी झाल्याने अवयवदान चळवळीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. या हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत सात यकृत प्रत्यारोपण यशस्वी पार पडल्या. परंतु हे सर्व प्रत्यारोपण मेंदूमृत व्यक्तीकडून मिळालेल्या अवयवाचे होते.

 

टॅग्स :Organ donationअवयव दानnagpurनागपूर