शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पेपरला १२ कॉपी सापडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 20:54 IST

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला नागपूर विभागीय मंडळाच्या भरारी पथकाकडून १२ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले. यात भंडारा जिल्ह्यातील तीन केंद्रावर १० कॉपी सापडल्या तर गडचिरोली जिल्ह्यात २ केंद्रावर कॉपी झाल्याची नोंद विभागीय मंडळाकडे झाली.

ठळक मुद्देभंडाऱ्यात तीन केंद्रावर सापडल्या १० कॉपी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला नागपूर विभागीय मंडळाच्या भरारी पथकाकडून १२ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले. यात भंडारा जिल्ह्यातील तीन केंद्रावर १० कॉपी सापडल्या तर गडचिरोली जिल्ह्यात २ केंद्रावर कॉपी झाल्याची नोंद विभागीय मंडळाकडे झाली.नागपूर विभागातून यावर्षी दहावीच्या परीक्षेत १ लाख ७२ हजार विद्यार्थ्यांनी ६९० केंद्रावरून परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी नागपूर विभागीय मंडळातर्फे परीक्षेसाठी जवळपास ४५ भरारी पथके तैनात आहेत. यात मंडळाचे स्वत:च्या १० पथकाचा समावेश आहे. मंडळाच्या पथकाने भंडारा जिल्ह्यातील आदर्श विद्यालय, सिहोरा येथून दोन विद्यार्थी, ग्रामविकास विद्यालय हरदोली, जि. भंडारा येथून सात विद्यार्थी व जि.प. हायस्कूल एकोडीकिनी येथून एका विद्यार्थ्याला कॉपी करताना प्रत्यक्ष पकडले. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातूनही दोन केंद्रावर विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडल्याची माहिती आहे.दरम्यान बोर्डाकडे काही केंद्रावर कॉपी होत आहे, सामूहिक कॉपी सुरू आहे, असे कॉल आले आहे. तसेच काहींचे निवेदन सुद्धा प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रत्येक पेपरला बोर्डाचे भरारी पथक आलेल्या तक्रारींची दखल घेऊन, केंद्राला भेटी देणार असल्याचे नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी सांगितले.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा