शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

पहिले भारतीय संविधान साहित्य संमेलन आजपासून : दीक्षाभूमी येथे सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 12:22 AM

संविधानातील विकासात्मक, कल्याणकारी आणि सामाजिक न्यायाचा विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश ठेवून पहिल्या भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या ८ व ९ जून रोजी नागपुरात होऊ घातले आहे. महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग हे या संमेलनाचे उद्घाटक असून, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. किशोर रोही हे संमेलनाचे अध्यक्ष असतील.

ठळक मुद्देन्यायमूर्ती रोही अध्यक्ष, अभय बंग यांच्याहस्ते उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधानातील विकासात्मक, कल्याणकारी आणि सामाजिक न्यायाचा विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश ठेवून पहिल्या भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या ८ व ९ जून रोजी नागपुरात होऊ घातले आहे. महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग हे या संमेलनाचे उद्घाटक असून, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. किशोर रोही हे संमेलनाचे अध्यक्ष असतील.माजी सनदी अधिकार ई. झेड. खोब्रागडे यांच्या पुढाकारातून संविधान फाऊंडेशनतर्फे आयोजित संमेलनाचे दीक्षाभूमीवरील ऑडिटोरियममध्ये सकाळी १० वाजत उद्घाटन होईल. संमेलन स्वागताध्यक्षा रेखा खोब्रागडे या आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात संविधानिक हक्क व कर्तव्याला धरून विविध विषयांवर चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन केले जाणार आहे. उद्घाटनीय सत्रात अन्न व औषध विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, ‘यशदा’चे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड विशेष अतिथी असतील. यावेळी भारतीय सनदी सेवेतील १९५६ च्या तुकडीचे ज्येष्ठ सनदी अधिकारी पी. एस. कृष्णन (दिल्ली) यांचा प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार केला जाईल.दुर्बल घटकांच्या संवाद सत्रात नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमनच्या सचिव अ‍ॅनी राजा, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. कुमकुम सिरपूरकर, सामाजिक कार्यकर्त्या समीना शेख, उद्योग विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, ज्येष्ठ सनदी अधिकारी पी. एस. कृष्णन, नागालॅण्डचे पोलीस महानिरीक्षक संदीप तामगाडगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, जनमंचचे प्रा. शरद पाटील, गुजरातचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनिल प्रथम, भविष्य निर्वाह आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे, आयकर विभागाचे सहआयुक्त अजय ढोके, प्रो. विमल थोरात, औरंगाबाद येथील सामाजिक कार्यकर्ता सिद्धार्थ मोकणे, अतुल खोब्रागडे व श्वेता उंबरे सहभागी होतील. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, क्रांती खोब्रागडे(आयआरएस), डॉ. जीवन बच्छाव (आयआरएस), पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार, सचिन ओंबासे, स्वच्छंद चव्हाण(आयआरएस), हे युवा सनदी अधिकारी सहभागी होतील. ज्येष्ठ कवी इ. मो. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे. ९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता न्या. किशोर रोही यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप होईल. यात राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया, दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त सुनीलकुमार गौतम, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. शंकर खोब्रागडे आदी उपस्थित असतील.

टॅग्स :literatureसाहित्यDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी