शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रथमच अनुकूल सरकार : श्याम मानव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 21:25 IST

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रथमच अनुकूल सरकार राज्याला मिळाले असून, कार्यकर्त्यांनी आता कामाला लागण्याचे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक प्रो. श्याम मानव यांनी शुक्रवारी येथे केले.

ठळक मुद्देअंनिसचे ‘अंधविश्वास उन्मूलन राष्ट्रीय संमेलन’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंधश्रद्धा निर्मूलनविषयक ‘जादूटोणा विरोधी कायदा’ डिसेंबर २००५मध्ये पारित होऊनही सर्वच राजकीय पक्षांमधील राजकीय लाभाचे कारण पाहता तो लटकतच गेला. डिसेंबर २०१३ मध्ये हा कायदा विधिसंमतही झाला. मात्र अंमलबजावणी झाली नाही. मात्र, विद्यमान सरकारच्या उपमुख्यमंत्र्यांनी या कायद्याबाबत गांभीर्य घेतले असून, त्या अनुषंगाने आराखडाही तयार झाला आहे. त्यामुळे, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रथमच अनुकूल सरकार राज्याला मिळाले असून, कार्यकर्त्यांनी आता कामाला लागण्याचे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक प्रो. श्याम मानव यांनी शुक्रवारी येथे केले.राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या पार्श्वभूमीवर अंनिसतर्फे रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘अंधविश्वास उन्मूलन राष्ट्रीय संमेलन २०२०’चे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी अंनिसचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे होते तर व्यासपीठावर कोषाध्यक्ष सुरेश अग्रवाल, महासचिव हरीश देशमुख, महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. बबनराव बेलसरे, सुरेश धुरमुरे, अ‍ॅड. गणेश येलगारे, गोविंद भंडारकर, प्रशांत सपाटे, रवी खानविलकर, हरिभाऊ पाथोटे, छाया सावरकर उपस्थित होते. अंनिससंदर्भात अनेक भ्रामक कल्पना पसरविण्यात आल्या. मात्र, अंनिसचे कार्य कोणत्याही धर्म किंवा ईश्वराच्या विरोधात नाही तर धर्म आणि ईश्वराचे नाव घेऊन फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबांच्या विरोधातील आहे, हे आता पटायला लागले आहे. नागपूर शहराची ओळखच ‘पोल खोल’ अशी झाली आहे आणि येथे अनेक भोंदूबाबांचे पितळ उघडे पाडले गेले आहे. गत सरकारने जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केवळ आश्वासने देण्याचे काम केले. त्यांची इच्छाही दिसली. मात्र, ते ज्या पक्षाचे आहेत, तो पक्ष अंधश्रद्धेला खतपाणी घालणाºया वचनांशी कटिबद्ध असल्याने आणि त्यांच्यावर प्रचंड दबाव असल्याने ते या कायद्यासंदर्भात तरतूद करू शकले नाहीत.मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: पुढाकार घेऊन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तयारी दर्शवली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने हा संपूर्ण आराखडा अमलात येणार असून, १ एप्रिलपासून सरकारमार्फत अभियानास सुरुवात होईल. त्याअनुषंगाने राज्यातील चार हजार शाळा व विविध जाहीर कार्यक्रमांची रूपरेखा आखण्यात आल्याचे मानव यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंधश्रद्धेविरोधात प्रबोधनकार ठाकरे यांचे स्मरण करून देत असल्याचे वारंवार कळते. त्यामुळे, हे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल आणि या पाच वर्षात जोमाने कामे करण्याचे आवाहन मानव यांनी कार्यकर्त्यांना केले.मात्र, वर्तमान आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: पुढाकार घेऊन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तयारी दर्शवली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने हा संपूर्ण आराखडा अमलात येणार असून, १ एप्रिलपासून सरकारमार्फत अभियानास सुरुवात होईल. त्याअनुषंगाने राज्यातील चार हजार शाळा व विविध जाहीर कार्यक्रमांची रूपरेखा आखण्यात आल्याचे श्याम मानव यांनी सांगितले. विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंधश्रद्धेविरोधात प्रबोधनकार ठाकरे यांचे स्मरण करून देत असल्याचे वारंवार कळते. त्यामुळे, हे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल आणि या पाच वर्षात जोमाने कामे करण्याचे आवाहन मानव यांनी कार्यकर्त्यांना केले.इंदोरीकर महाराजांना विरोध करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते नव्हेतप्रबोधक कीर्तनकाकार निवृत्ती देशमुख उपाख्य इंदोरीकर महाराजांना विरोध करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते नव्हेत. सम-विषम तिथीसंदर्भात महाराजांनी जेव्हा माफी मागितली, तेव्हाच विषय संपलेला होता. आम्ही त्यांचा विरोध केलेला नाही, असे परखड मत अंनिसचे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.कीर्तन-प्रबोधनासाठी इंदोरीकर महाराज मनोरंजनाचा भाग टाकतात. वारकऱ्यांच्या कीर्तन परंपरेत मनोरंजन नसते. त्यामुळे, इंदोरीकरांना कीर्तनकार म्हणावे का, असा प्रश्न आहे. तरीदेखील त्यांनी स्त्रियांविषयी अनादर करणारे वक्तव्य केले होते. सम-विषम तिथीचे त्यांचे वक्तव्य अवैज्ञानिक होते. वक्ता बरेचदा बोलण्याच्या ओघात वाहवत जातो. खूप कमी वक्ते न वाहवणारे आहेत. मात्र, त्यांनी माफी मागितल्यानंतर हा विषय तेव्हाच संपला. महाराजांना आता ही चांगली संधी आहे. त्यांना आपली चूक सुधारायची इच्छा दिसते तर त्यांना ही संधी देणे क्रमप्राप्त आहे. ते प्रबोधनाचे काम करत असतील तर त्यांचे स्वागत करतो. कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठात होणाऱ्या त्यांच्या कीर्तनाला विरोध करणारे माझे कार्यकर्ते नाहीत. महाराज हे गुन्हेगार नाहीत आणि फसवणूक करणारे बाबाही नाहीत. म्हणून त्यांना संधी देण्याचे आवाहन प्रा. श्याम मानव यांनी केले.

टॅग्स :shyam manavश्याम मानवnagpurनागपूर