शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आधी मावस सासरा, नंतर पतीच्या दोन मित्रांनी केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 22:41 IST

Nagpur News मध्य प्रदेशातून कामाच्या शोधात आलेल्या एका महिलेवर पहिल्यांदा मावस सासऱ्याने व त्यानंतर पतीच्या दोन मित्रांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. नराधमांच्या तावडीतून आपली सुटका करून या महिलेने माहेर गाठले.

ठळक मुद्देचार आरोपींना केली अटक

नागपूर : मध्य प्रदेशातून कामाच्या शोधात आलेल्या एका महिलेवर पहिल्यांदा मावस सासऱ्याने व त्यानंतर पतीच्या दोन मित्रांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. नराधमांच्या तावडीतून आपली सुटका करून या महिलेने माहेर गाठले. मध्य प्रदेशातील शिवनी येथे तक्रार दिली. परंतु घटनास्थळ कोराडी असल्यामुळे हे प्रकरण कोराडी पोलिसांकडे पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

शिवनी, मध्य प्रदेशमधील चीलाचौंध ता. लखनादौन या गावातील एक महिला आपल्या पतीसह २ डिसेंबर २०२१ ला कळमेश्वर येथे बांधकाम मजुरीचे काम करायला आली. तिला कळमेश्वर येथे एका झोपडीत तिच्या मावस सासऱ्याकडे राहायला सांगितले. पती वर्धा येथे काम करायचा. ६ डिसेंबर २०२१ ला या महिलेचा मावस सासरा कृष्णा देहरिया (४०) याने सदर महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. पती परतल्यानंतर तिने ही घटना पतीला सांगितली. परंतु याबाबतवाच्यता न करण्याची धमकी पतीने दिली.

महिलेवर अत्याचार होत असल्याची बाब तिच्या ठेकेदाराला कळली. त्याने या महिलेची सुटका करीत तिला १६ डिसेंबर २०२१ रोजी कोराडीला पाठविले. कोराडीत तायवाडे कॉलेज परिसरात एका झोपडीत ती राहून बांधकाम मजूर म्हणून काम करीत होती. १८ डिसेंबरला रात्री ९ वाजता तिचा पती तेथे पोहोचला. महिलेने सांगितलेल्या आपबितीनुसार तिचा पती रामफल डहरिया याने बाजूच्या झोपडीत मित्रासह दारू घेतली. त्यानंतर त्याने तिला झोपडीत बोलावले. तेथे त्याचा मित्र अजय व प्रदीप होते. अजय व तिच्या पतीने बाहेरुन झोपडीचे दार लावले. आत पत्नी व प्रदीप नावाचा मित्र होता. त्याने या महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर प्रदीप बाहेर आला आणि अजयने तिच्यावर बलात्कार केला. बाहेर तिचा पती देखरेख करीत होता. अजय आणि प्रदीपने आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अजय व प्रदीपने बलात्कार केला.

त्यांच्या तावडीतून आपली सुटका करून या महिलेने ६ मार्चला माहेर गाठून बहिणीला ही घटना सांगितली. त्यानंतर त्यांनी शिवनी पोलिसात तक्रार दाखल केली. घटनास्थळ कोराडी असल्यामुळे शिवनी पोलिसांनी तिला कोराडीत पाठविले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अजय (२८), प्रदीप (३२), कृष्णा डेहरिया (४०) आणि पती रामफल (३०) यांना अटक केली आहे. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहेत.

.............

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी