शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

चिंता वाढली! नागपूरमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव, 'त्या' व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 17:51 IST

५ डिसेंबरला आफ्रिकेतून प्रवास करून नागपूरमध्ये परतलेल्या एका व्यक्तीला या संसर्गाची लागण झाली आहे. नागपूर विमानतळावर आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर तो पॉझिटिव्ह आढळला.

नागपूर : आफ्रिकेतून नागपूरमध्ये आलेल्या एका ४० वर्षीय व्यक्तीमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून स्पष्ट झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा नागपुरातील हा पहिला रुग्ण आहे. नागपूर महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

मुंबई आणि पुण्यानंतर ओमायक्रॉन या व्हेरियंटने आता नागपूरमध्ये शिरकाव केला आहे. ५ डिसेंबरला आफ्रिकेतून प्रवास करून नागपूरमध्ये परतलेल्या एका व्यक्तीला या संसर्गाची लागण झाली आहे. नागपूर विमानतळावर आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर तो पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर त्याला  एम्समध्ये भरती करण्यात आले. ६ डिसेंबरला जिनोम सिक्वेंसिंगसाठी नमुने पाठविण्यात आले होते. त्या रुग्णाचा ओमायक्रोनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

सध्या या रुग्णावर एम्समध्ये  उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार दहाव्या दिवशी पुन्हा ‘आरटीपीसीआर’ तपासणी करण्यात येणार असून निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी पाठविण्यात येईल. या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या कुटुंबियांची चाचणी केली असता त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस