शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रेतीच्या वादातून नागपूरनजीकच्या पिपरीत फायरिंग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 23:28 IST

देशी कट्ट्यातून झाडण्यात आलेल्या छºर्यांमुळे एक जण जखमी झाला तर, दुसऱ्यावर चाकूने वार करण्यात आल्याने तो अत्यवस्थ आहे. ही घटना कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरी येथे मंगळवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घडली. हा प्रकार रेतीच्या वादातून घडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात असूनही पोलीसही संभ्रमात आहेत.

ठळक मुद्देएक अत्यवस्थ : पोलीस संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्ककन्हान : देशी कट्ट्यातून झाडण्यात आलेल्या छºर्यांमुळे एक जण जखमी झाला तर, दुसऱ्यावर चाकूने वार करण्यात आल्याने तो अत्यवस्थ आहे. ही घटना कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरी येथे मंगळवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घडली. हा प्रकार रेतीच्या वादातून घडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात असूनही पोलीसही संभ्रमात आहेत.अमर ऊर्फ गब्बर भारत सोनटक्के (३०, रा. पिपरी, ता. कन्हान) असे गंभीर जखमीचे तर रोहन श्याम खरे (२९, रा. पाटीलनगर, कन्हान, ता. पारशिवनी) असे छºर्यामुळे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पिपरी परिसरात मृतदेह पडला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मात्र, तिथे अमर जखमी अवस्थेत पडला असल्याचे निदर्शनास आले. त्याच्यावर चाकूने वार केले होते. तो कन्हान नगर परिषदेत टँकरचालक म्हणून काम करतो.दुसरीकडे, रोहन हादेखील स्वत:हून कन्हान येथील शासकीय रुग्णलयात भरती झाला. त्याने पोलिसांना सांगितले की तो कॅटरिंगचा व्यवसाय करीत असल्याने कामगारांना पैसे देण्यासाठी रात्री पिपरी येथे गेला होता. तेथील चर्चजवळ पैसे देत असताना कुणीतरी त्याच्या दिशेने फायरिंग केले. त्यात त्याच्या पोटात अंदाजे २० छर्रे शिरले. दरम्यान, दोघांनाही नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले.अमर व रोहन रेती व्यवसायात गुंतले असून, वेगवेगळ्या गटात सहभागी आहेत. या दोन्ही गटांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू आहे. याच वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि त्यात अमर जखमी झाला असावा तसेच त्यानंतर रोहनवर छर्रे फायर करण्यात आले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :Firingगोळीबारnagpurनागपूर