शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

पोलीस ठाण्यात फायरिंग... यूपी, एमपी अन् आता महाराष्ट्र

By नरेश डोंगरे | Updated: February 5, 2024 00:02 IST

बिहार, उत्तरप्रदेश मध्ये अशा घटना गृहित धरल्या जात होत्या. तिकडे जंगलराज असल्याची टिका होत होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगर असो अथवा छोटे शहर, त्या ठिकाणचे सर्वात सुरक्षित स्थळ म्हणजे पोलीस स्टेशन ! त्यामुळे सर्वसामान्य पीडित व्यक्ती थोडे काही धाकधुक झाले तर थेट पोलीस ठाणे गाठतो. एवढेच काय, एखादा कुख्यात गावगुंडही धोक्याची कल्पना येताच सरळ पोलीस ठाण्यात धाव घेतो. या ठिकाणी आपल्याला काही होणार नाही, येथे आपण सुरक्षित राहू, असा प्रत्येकाला विश्वास वाटतो. मात्र, गेल्या काही दिवसांत चक्क पोलीस ठाण्यातच गोळ्या झाडल्या जाऊ लागल्याने या विश्वासाला तडे जाऊ लागले आहे. बिहार, उत्तरप्रदेश मध्ये अशा घटना गृहित धरल्या जात होत्या. तिकडे जंगलराज असल्याची टिका होत होती. मात्र, बिहार, युपीतील हे खतरनाक लोण आता एमपी मार्गे महाराष्ट्रात दाखल झाले आहे. सत्तापक्षातील आमदाराने मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर शुक्रवारी रात्री चक्क हिललाईन (उल्हासनगर) ठाण्यात गोळ्या झाडून देशभरात खळबळ उडवून दिली आहे.

पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात नागपूरसह विविध ठिकाणी यापूर्वी घडल्या. गडचिरोलीत कॅम्पवर असलेल्या पोलीस शिपायाने आपल्याच सहकाऱ्यावर गोळ्या झाडल्याचीही घटना दोन वर्षांपूर्वी घडली. मात्र, एखाद्या आमदाराने चक्क पोलीस ठाण्यात राजकीय पक्षाच्या नेत्यावर गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न करण्याची ही घटना वेगळीच आहे.

बेहडी (बरेली) पोलीस स्टेशनगेल्या दोन वर्षांत पोलीस ठाण्यात गोळी झाडून कुण्याच्या हत्येचा प्रयत्न करण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना उत्तर प्रदेशात घडल्या. यातील पहिली घटना ११ सप्टेंबर २०२२ बेहडी (बरेली) पोलीस ठाण्यात घडली. सोबत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याशी संबंधित नाजूक प्रकरणावरून एका कॉन्स्टेबलने ठाण्यात अंधाधूंद गोळ्या झाडल्या होत्या. यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.अलिगड (कोतवाली) पोलीस स्टेशनउत्तर प्रदेशातीलच अलिगडमधील एका ठाण्यात आलेल्या एका निरपराध महिलेवर ठाणेदाराने गोळी झाडली होती. ८ डिसेंबर २०२३ ला ही घटना घडली. या घटनेने गेल्या वर्षी सर्वत्र एकच खळबळ उडवून दिली होती.रिवा (मध्य प्रदेश) पोलीॅस स्टेशनकामाचा ताणतणाव अन् देण्याघेण्यावरून खटकल्यामुळे २७ जुलै २०२३ ला पीएसआय बी. आर. सिंह याने ठाणेदार हितेंद्रनाथ शर्मा यांच्यावर गोळी झाडून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला होता. मध्यप्रदेशातील रिवा, सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात ही घटना घडली होती.

टॅग्स :Ganpat Gaikwadगणपत गायकवाड