शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

नागपूरनजीकच्या भंडारा मार्गावरील माथनी येथे दरोडेखोरांचा पोलिसांवर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 22:03 IST

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर नागपूरकडे पळून येत असलेल्या दरोडेखोरांनी नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांवर चक्क रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. ही घटना नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माथनी येथे सोमवारच्या मध्यरात्री घडली.

ठळक मुद्देनाकाबंदी दरम्यान घडला प्रकार

आॅनलाईन लोकमतनागपूर : भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर नागपूरकडे पळून येत असलेल्या दरोडेखोरांनी नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांवर चक्क रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. ही घटना नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माथनी येथे सोमवारच्या मध्यरात्री घडली.घटना अशी की, दरोडेखोरांनी सोमवारी रात्री तुमसर (जिल्हा भंडारा) येथील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. मात्र, त्यांनी डीएल-३ सी/एएस-४९१३ क्रमांकाच्या कारने घटनास्थळाहून पळ काढला. हे दरोडेखोर भंडारा मार्गे नागपूरच्या दिशेने पळाले असल्याची माहिती नियंत्रण कक्षाद्वारे मौदा पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे मौदा ठाण्यातील रमेश येडे, किशोर नारायणे, हेमराज सोनवणे, दीपक पोटफोडे यांनी माथनी शिवारातील टोल नाक्यावर नाकाबंदी करून नागपूरच्या दिशेने जाणाºया वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली.दरम्यान, पोलिसांनी डीएल-३ सी/एएस-४९१३ क्रमांकाची कार थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यातच चालकाने कार थांबवून थोडी मागे घेतली आणि कारमधील एकाने पोलीस कर्मचारी रमेश येडे यांच्या दिशेने गोळी झाडली. सुदैवाने यात त्यांना दुखापत झाली नाही. कारमधील दुसऱ्याने किशोर नारायणे यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखले होते. दरोडेखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकावर आदळली. या धावपळीत आरोपींनी कार तिथेच सोडून पळ काढला. दरोडेखोर २५ ते ३० वर्षे वयोगटातील असून, त्यांची संख्या कळू शकली नाही. या प्रकरणी मौदा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि ३०७, ३५३, ३४ व आर्म अ‍ॅक्ट सहकलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.कार जप्तजप्त कारची पोलिसांनी झडती घेतली असता कारमध्ये गॅस सिलिंडर, गॅस कटर, आॅक्सीजन सिलिंडर, दोन सब्बल, कपडे, बॅग आदी साहित्य आढळून आले. हे संपूर्ण साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती मौदा पोलिसांनी दिली.

टॅग्स :Firingगोळीबारnagpurनागपूर