शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
2
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
3
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
4
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
5
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
6
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
7
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
8
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
9
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
10
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
11
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
12
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
13
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
14
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
15
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
16
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
17
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
18
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
19
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
20
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद

नागपुरातील  टीबी वॉर्ड परिसरात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:35 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय(मेडिकल)अंतर्गत येणाऱ्या ‘टीबी’ वॉर्ड परिसरात शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलच्या (एमएसएफ)जवानांनी वेळीच तत्परता दाखविल्याने मोठी दुर्घटना टळली.

ठळक मुद्देएमएसएफच्या जवानांनी दाखविली तत्परता

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय(मेडिकल)अंतर्गत येणाऱ्या ‘टीबी’ वॉर्ड परिसरात शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलच्या (एमएसएफ)जवानांनी वेळीच तत्परता दाखविल्याने मोठी दुर्घटना टळली.मेडिकलपासून काही अंतरावर असलेला टीबी वॉर्ड परिसर हा झाडेझुडपांनी वेढला आहे. या भागात विशेष सफाई होत नसल्याने अनेक भागात कचऱ्याचा ढीगही साचला आहे. याच परिसरात क्षयरोग व त्वचारोग विभागाचा वॉर्ड आहे तर जवळच कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आहे. शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने चांगलाच पेट घेतला. त्यावेळी या भागात कर्तव्यावर असलेले महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान अंकुश खानझोडे व सहकारी कुळमेथे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला दोघांनीही झाडांच्या फांद्यांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग वाढतच चालली आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन बंबाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील दुर्घटना टळली. या घटनेकडे दुर्लक्ष केले असते तर आग क्षयरोग वॉर्डापर्यंत पोहचून मोठे नुकसान झाले असते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :fireआगhospitalहॉस्पिटल