शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या कळमना येथील झोपडपट्टीला आग : सात झोपड्या खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 19:55 IST

कळमना भागातील डिप्टी सिग्नल आदिवासी प्रकाश नगर येथील झोपडपट्टीला सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास लागलेल्या आगीत सात झोपड्या जळून खाक झाल्या.

ठळक मुद्देरोख रकमेसह साहित्य नष्ट : धरमपेठ येथील प्लास्टिक गोदामाला आग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना भागातील डिप्टी सिग्नल आदिवासी प्रकाश नगर येथील झोपडपट्टीला सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास लागलेल्या आगीत सात झोपड्या जळून खाक झाल्या. यात रोख रकमेसह लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच सकाळी ६ च्या सुमारास धरमपेठ येथील प्लास्टिक गोदामाला आग लागली. यात प्लास्टिकचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशामक विभागाच्या जवानांनी दोन्ही आगी नियंत्रणात आणल्या.

आदिवासी प्रकाशनगर झोपडपट्टीला आग लागण्याची माहिती मिळताच कळमना अग्निशमन केंद्राच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. परंतु आगीची भीषणता लक्षात घेता महापालिका मुख्यालय, सुगतनगर येथील सहा गाड्या पाठविण्यात आल्या. आगीत धर्मेंद्र लांजेवार, सत्यम गोपीप्रसाद, व्यंकेंद्र पत्की, लक्ष्मण दांडेकर, देवचंद युवनादी, नाज अब्दुल शेख व सतीश सहारे आदींच्या झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. झोपडपट्टीधारकांनी दिलेल्या माहितीनुसार आगीत घरातील रोख रक्कम तसेच सर्व साहित्य जळून खाक झाले. तसेच कल्पना दाभने यांच्या घरातील कपडे व टीव्हीचे नुकसान झाले. आगीत संपूर्ण साहित्य जळाल्याने झोपडपट्टीधारकांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. परिसरात सर्वत्र जळालेल्या झोपड्यांची राख पसरली होती.
माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके , स्थानाधिकारी बी.पी. चंदनखेडे, राजेंद्र दुबे, सुनील डोकरे, मोहन गुडधे, सुनील राऊ त, केशव कोठे यांच्यासह अग्निशमन विभागाच्या जवानांनी धाव घेतली.प्लास्टिक गोदामाला आग
धरमपेठ भागातील ट्राफिक चिल्ड्रेन पार्क लगतच्या गजानन मंदिरासमोरील जितेंद्र जैन यांच्या दोन मजली सचिन प्लास्टिक गोदामाला सकाळी ६ च्या सुमारास अचानक आग लागली. आगीत प्लास्टिक खूर्च्या, टेबल, एसी, मीटर, गॅस सिलिंडर यासाठी प्लास्टिकचे साहित्य नष्ट झाल्याने लाखो रुपयांचे नुसान झाले. प्लास्टिक साहित्यामुळे परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी आग नियंत्रणात आणली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर