शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राजधानी एक्स्प्रेसला लागली आग : प्रवासी थोडक्यात बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:08 IST

सिकंदराबादवरून निजामुद्दीनला जात असलेल्या १२४३७ राजधानी एक्स्प्रेसला रात्री १० वाजता नरखेड-दारीमेटा दरम्यान अचानक आग लागली. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील नरखेड जवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिकंदराबादवरून निजामुद्दीनला जात असलेल्या १२४३७ राजधानी एक्स्प्रेसला रात्री १० वाजता नरखेड-दारीमेटा दरम्यान अचानक आग लागली. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार सिकंदराबाद-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस नागपूरवरून बुधवारी सुटली. ही गाडी रात्री १० वाजता नरखेड ते दारीमेटा दरम्यान किलोमीटर क्रमांक ९४८ येथे असताना या गाडीच्या मागील एसएलआर कोचमधून धूर आणि आगीच्या ठिणग्या निघाल्या. ही बाब गार्डच्या लक्षात आल्यानंतर त्याने लगेच वॉकीटॉकीवरून लोकोपायलटला सूचना दिली. त्यानंतर लगेच ही गाडी थांबविण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. काही अधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्ष गाठले. नरखेड स्टेशन आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने एसएलआर कोचला वेगळे करण्यात आले. आग लागलेला कोच गाडीपासून वेगळा करण्यात आला. जवळपास दीड तासानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. या घटनेमुळे केरळ एक्स्प्रेससह काही गाड्यांना विलंब झाला.

टॅग्स :fireआगRajdhani Expressराजधानी एक्स्प्रेस