शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर येथील अग्निशमन अधिकाऱ्यांचा लूक बलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:58 IST

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीतील महापालिकेच्या अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचारी लवकरच नव्या गणवेशात दिसणार आहे. गणवेश खरेदीबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीकडे प्रस्ताव : मुंबईच्या धर्तीवर गणवेश मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीतील महापालिकेच्या अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचारी लवकरच नव्या गणवेशात दिसणार आहे. गणवेश खरेदीबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुंबई, पुणे, ठाणे यासह राज्यातील सर्व शहरातील अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा एकसमान गणवेश बनविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार गेल्या काही महिन्यापूर्वी सभागृहात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने गणवेश खरेदीचा प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आला होता.फायरमन आणि अग्निशमन अधिकारी यांचा गणवेश ब्ल्यू पॅन्ट आणि पांढरा शर्ट, पिवळी कॅप आणि खांदा बॅच असा राहणार आहे. सोबतच लेदर शूज, टोपी, पट्टा, बक्कल , स्पोर्ट शूज,  रेनकोट  आदीं साहित्याचा यात समावेश आहे. पोलिसांप्रमाणे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनादरम्यान ओळखता यावे यासाठी सर्व महापालिकांच्या अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गणवेश समान ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत गणवेश खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मंजुरी मिळाल्यास विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा लवकरच लूक बदलणार आहे. यावर एक कोटीच्या आसपास खर्च येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :fireआगNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका