शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला आताच सांगा...! लोकसभेच्या निकालापूर्वीच भुजबळांनी विधानसभेच्या जागावाटपाची ठिणगी टाकली
2
“यूपीत एनडीएला ७५ प्लस जागा मिळतील, महाराष्ट्रात...”; रामदास आठवलेंनी थेट आकडा सांगितला
3
राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या पक्षाला किती जागा मिळतील? अमित शाहंनी केली भविष्यवाणी
4
सेम टू सेम! जुळ्या भावांचे यशही जुळं; सार्थक अन् स्वप्नीलने दहावीत मिळविले १०० टक्के गुण
5
१९९१ साली जे घडलं ते पुन्हा नको म्हणून २००४ ला CM पद नाकारलं; अजित पवारांचा दावा
6
पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे होतील; माजी PM इम्रान खान यांनी व्यक्त केली चिंता
7
SRH च्या पराभवानंतर काव्या मारन रडली; आता संघातील 'या' खेळाडूंची होणार गच्छंती...
8
"कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी..."; मनु्स्मृतीबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान
9
Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरानं वाढवली सराफा बाजारातली गरमी, घसरणीनंतर पुन्हा वाढले दर
10
भारतात पहिल्यांदाच आले सर्वात मोठे जहाज; चार फुटबॉलचे मैदान होतील एवढी आहे जागा
11
SSC Result 2024: दहावी निकालात लातूर पॅटर्नचा दबदबा; १२३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
12
"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद! 
13
Anurag Thakur : "काँग्रेसचं पाकिस्तानवर प्रेम, भारताच्या भागाला PoK बनवलं"; अनुराग ठाकूर कडाडले
14
एक ठिणगी आणि..., राजकोट टीआरपी गेम झोनमध्ये कशी भडकली आग? CCTV फुटेज आलं समोर
15
Pune Porsche Accident News : 'बाळा'च्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले; दुसऱ्याचे लॅबला पाठवले, डॉक्टरांचे बिंग फुटले
16
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
17
“रवींद्र धंगेकरांनी माफी मागावी, नाहीतर मानहानीचा दावा करणार”: हसन मुश्रीफ, पण प्रकरण काय?
18
मनसे कार्यकर्ते थेट राज ठाकरेंनाच व्हिडिओ पाठवणार; मनातील भावना व्यक्त करणार
19
शरद पवारांचे २ युवा शिलेदार अजित पवारांकडे; 'तुतारी' खाली ठेवत हाती 'घड्याळ' बांधणार
20
Dhadak 2: एक था राजा, एक थी रानी...! 'धडक 2' ची घोषणा, ही फ्रेश जोडी मुख्य भूमिकेत दिसणार

नागपुरात  इलेक्ट्रिकल कंपनीच्या कार्यालयात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:12 AM

देवनगर येथील कइलेक्ट्रिकल्स कंपनीच्या कार्यालयात सोमवारी सकाळी भीषण आग लागली. गोकुल-केशव कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या माळ्यावर असलेले कार्यालय रविवारी बंद होते. सोमवारी सकाळी ८.३० वाजता नागरिकांना इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरून धूर निघताना दिसून आला. काही वेळातच इलेक्ट्रिक कंपनीच्या कार्यालयातील खिडक्यांमधून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याने नागरिकांनी अग्निशमन विभागाला सूचना दिली.

ठळक मुद्देदेवनगर येथील घटना : लाखो रुपयांचे साहित्य जळाले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देवनगर येथील कइलेक्ट्रिकल्स कंपनीच्या कार्यालयात सोमवारी सकाळी भीषण आग लागली. गोकुल-केशव कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या माळ्यावर असलेले कार्यालय रविवारी बंद होते. सोमवारी सकाळी ८.३० वाजता नागरिकांना इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरून धूर निघताना दिसून आला. काही वेळातच इलेक्ट्रिक कंपनीच्या कार्यालयातील खिडक्यांमधून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याने नागरिकांनी अग्निशमन विभागाला सूचना दिली.

माहिती मिळताच नरेंद्रनगर स्टेशनचे अधिकारी धर्मपाल नाकोड हे दोन गाड्यांसह घटनास्थळी पोहोचले. तीन माळ्याच्या या इमारतीतील दुसऱ्या माळ्यावरील खिडक्यांमधून आगीच्या ज्वाळा व धूर निघत होता. अग्निशमन दलाचे कर्मचारी कंपनीच्या मुख्य दरवाजातून आत जाण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याने आत जाण्यात अडचण येत होती. थोड्या प्रयत्नानंतर खिडक्या आणि दरवाजांच्या काचा फोडून अग्निशमन दलाचे जवान आत घुसले. कार्यालयातील ११ सिलिंग पंखे, ४ एसी, ४ कॉम्प्युटर, १ झेरॉक्स मशीन, प्रिंटर, इनव्हर्टर, बॅटरी, फर्निचर, खुर्च्यांसह दस्तावेज जळून खाक झाले होते. सकाळी ११ वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. परंतु धूर निघत असल्याने दुपारी १२ वाजेपर्यंत पाणी टाकण्याचे काम सुरू होते. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. परंतु कार्यालयाचे ब्रँच मॅनेजर मनीष शुक्ला यांनी इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तविली.