शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

मेडिकलमध्ये लागणार अग्निशमन उपकरणे

By admin | Updated: June 16, 2014 01:06 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) मागील काही वर्षांत आगीच्या घटनेत वाढ झाली आहे. याची दखल घेत मेडिकल प्रशासन १८ ठिकाणी अग्निशमन उपकरणे लावणार आहे.

५० हजारांच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) मागील काही वर्षांत आगीच्या घटनेत वाढ झाली आहे. याची दखल घेत मेडिकल प्रशासन १८ ठिकाणी अग्निशमन उपकरणे लावणार आहे. या सोबतच सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना ही उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षणही देणार आहे. आगीसारखी दुर्घटना घडून रुग्णांचे प्राण संकटात सापडू नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ही पावले उचलली आहेत. अधिष्ठात्यांनी उपकरणे खरेदीच्या प्रस्तावाला गुरुवारी मंजुरीही दिली आहे. विजेचे उपकरण, पेट्रोलियम पदार्थ आणि रसायनांमुळे लागणाऱ्या तिन्ही स्वरूपाच्या आगी विझविण्यासाठी वापरले जाणारे ‘फायर इस्टिंग्युशर सिलिंडर’ कार्यान्वित केले जाणार आहेत. आॅपरेशन थिएटर, पेर्इंग वॉर्ड, एमआर आॅफिस आणि अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात हे उपकरण लवकरच कार्यान्वित केले जाणार आहे. स्थानिक स्तरावर ५० हजार रु पयांपर्यंतच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी देण्याचा अधिकार अधिष्ठात्यांना असतो. त्यात मेडिकलमध्ये गेल्या आठवड्यात ई-लायब्ररीजवळ आगीची दुर्घटना घडली होती. प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने या आगीत सरकारी मालमत्तेचे नुकसान होता होता वाचले होते. या घटनेला गंभीरतेने घेत वॉर्डांमध्ये अशी घटना घडू नये, यासाठी अधिष्ठात्यांनी या फायर फायटिंग उपकरण खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. प्रगती कॉलनीतील मॉडर्न ट्रेडिंग कॉर्पोरेशन या कंपनीला या फायर फायटिंग उपकरणाचे कंत्राट देण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आॅपरेशन थिएटर परिसरात सहा, पेर्इंग वॉर्डात चार, एमआर आॅफिस परिसरात सहा आणि अधीक्षकांच्या कार्यालयालगतच्या ईएनटी बाह्यरु ग्ण विभागात दोन असे १८ सिलिंडर बसविले जाणार आहेत. (प्रतिनिधी)